चांदूर रेल्वे येथील सरकारी कर्मचारी संपावर नागरीकांची गैरसोय

0
797
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )

सातवा वेतन आयोग तत्काळ लागु करावा या प्रमुख मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी संपावर गेले असतांना चांदूर रेल्वे शहरातील कर्मचाऱ्यांचा सुध्दा यामध्ये समावेश झाला आहे. शहरातील तहसिलसह इतर सरकारी कर्मचारी संपावर गेल्याने नागरीकांची प्रचंड गैरसोय झाल्याचे चित्र आहे.

सातवा वेतन आयोग लागु करावा, जुनी पेन्शन योजना लागु करा, प्रशासनातील १ लाख ८० हजार रीक्त पदे तातडीने भरावी, पाच दिवसांचा आठवडा करावा, निवृत्तीचे वय ६० वर्ष करा, महिलांना २ वर्षांची बालसंगोपन रजा मंजुर करा, १ जानेवारी २०१८ पासुन महागाई भत्ता व मागील भत्त्यांची १४ महिन्यांची थकबाकी त्वरीत द्या, खाजगीकरण व कंत्राटीकरण रद्द करा, अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना सेवेत सामावून घ्या, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यास शासन सेवेत सामावुन घ्या आदी मागण्यांकरीता मंगळवारपासुन महाराष्ट्र मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकरलेल्या तीन दिवस संपात श्रेणी ३ व ४ चे सरकारी कर्मचारी सहभागी झाले आहे. तहसिल कार्यालयातील ओ. व्ही. लादे, बी. डी. भगत, डी. एस. रामचौरे, एच. डब्लु. भाकरे, एस. टी. जाधव, एम. एन. सोनारकर, ए. ए. चवरे, आर. बी. खोपे, एस. ए. चव्हाण, सी. पी. घुगे, डी. जी. परतेती, मडावी, नेहमीचंद कोहाड, प्रफुल देशमुख, बि. के. कांबळे, डि. एस. सिरसाट, एस. एस. रेडे, एन. डी. बढीये, ए. जी. ठवकर, व्ही. जी. आत्राम, जे. बी. ढमाले, एम. आर. उईके, सी. एल. मोरे, एम. अे. इंगोले, एस. यु. खेडकर, एस. आर. चव्हाण, आर. बी. कुकडी, पी. व्ही. खानझोडे, एम. डी. वासनिक, एल. ए. वाढोणकर, के. डी. नागरे, आर. एन. वानखडे, आर. डब्लु. गुल्हाणे, एम. एम. धोटे, बि. के. इंगोले, पी. एम. थोरात, एस. आर. सावंत, एस. आर. सोळंके, एल. व्ही. वडेकर, एस. पी. ढगे, एस. बी. राठोड, पी. पी. वानखडे या सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तहसिलसोबतच पंचायत समिती, कृषी विभाग, पाटबंधारे विभाग आदी विभागातील कर्मचारी सुध्दा सहभागी आहे.