शरद पवार यांच्या घरासमोर मराठा समाजाचं ठिय्या आंदोलन.

0
782
Google search engine
Google search engine

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी संपूर्ण समाज रस्त्यावर उतरला असून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तसेचआंदोलकांच्या वतीने राज्यातील सर्व आमदार, खासदार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलंजात आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती येथील घरासमोर मराठा आंदोलकांनी जोरदार आंदोलन सुरू केलं आहे.बारामती येथे ‘गोविंदबाग’ हे शरद पवार यांचं निवासस्थान आहे. या ठिकाणी मराठा आंदोलकांनी आज सकाळी एकत्र येऊन घोषणाबाजी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे,कोण म्हणतं देणार नाही-घेतल्याशिवाय राहणारनाही, अशा घोषणा सुरू होत्या.