मराठा आंदोलकांनी कोंढव्यात घातला जागरण गोंधळ

0
837
Google search engine
Google search engine

सामुदायीक मुंडन करुन सरकारचा प्रतिकारात्मक निषेध

 

अनिल चौधरी, पुणे

सकल मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने आज कोंढवा भागामध्ये आरक्षणासाठी मोर्चा काढून सरकारच्या विरोधात  जागरण गोंधळ घालून आणि सामुदायिक मुंडन करून सरकारचा निषेध करण्यात आला.

     सकल मराठा समाज, मुस्लीम समाज, धनगर समाज यांना आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरापासून मिठानगर, कौसरबाग मार्गे वीर तानाजी मालुसरे चौकापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुस्लीम समाज,धनगर समाज आणि मराठा समाज यांच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रंगी एक मराठा….लाख मराठा ..या घोषणांनी परिसर दनादून सोडला होता. यावेळी आंदोलकांनी मराठा, धनगर, मुस्लीम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशा घोषणा दिल्या. यामध्ये मुस्लीम समाज मोठ्या प्रामाणात उपस्थित होता.

   मोर्चाची सांगता वीर तानाजी मालुसरे चौकात चक्का जाम करुन ,संपूर्ण गोल रिंगण करून मध्ये जागरण गोंधळ घालून तसेच सामुदायिक मुंडण करुन करण्यात आली.

    याप्रंगी मा.आ.महादेव बाबर, मा.नगरसेवक भरत चौधरी, तानाजी लोणकर, रईस शेख, मदन शिंदे, संजय लोणकर, मारुती ननावरे, प्रकाश काटे, सत्पाल पारगे, राहुल लोणकर, लक्ष्मण लोणकर, प्रशांत लोणकर, संतोष गोरड,ज्ञानेश्वर भोईटे, विलास कापरे, आबा रोकडे, सतीश शिंदे, महेशआबा लोणकर, विनोद गव्हाणे, अंबादास शिंगे, दादा लोणकर, महेंद्र गव्हाणे, विनोद गव्हाणे, प्रतिक लोणकर, राजेंद्र बाबर, रोहित गोते, संजय बाबर, प्रसाद गव्हाणे, नाना भाडळे तसेच कोंढवा खुर्द ग्रामस्थ , मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.