राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; सरकार सोबतच्या चर्चेनंतर कोंडी फुटली.

431

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपआज मागे घेण्यात आला आहे. थोड्याच वेळात याबद्दलची अधिकृत घोषणा कर्मचारी संघटनेकडून करण्यात येणार आहे. संपाच्या तिसऱ्या दिवशी सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर ही कोंडी फुटली. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संप मागे घेण्याचं आवाहन सरकारनं केलंहोतं. या आवाहनाला कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतला. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून संपावर होते. राज्य कर्मचारी समन्वय संघटनांनी पुकारलेल्या या संपात 17 लाख कर्मचारी सहभागी झाले होते. मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या संपात सहभाग होता.

जाहिरात