लासलगाव शहरात शंभर टक्के बंदला प्रतिसाद

0
810
Google search engine
Google search engine

नाशिक :- उत्तम गिते

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून लासलगाव शहरात सकल मराठा क्रांती मोर्चा च्यावतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला आज दि.9 ऑगस्ट रोजी लासलगाव येथे मोठा प्रतिसाद मिळालेला आहे.

लासलगाव येथे आज दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आले आहे. लासलगाव शहरात आज सकाळपासून दुकानदार यांनी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवली. त्याचप्रमाणे लासलगाव येथील आशिया खंडातील सर्वात मोठी असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीतही कुठल्याच प्रकारे शेतमाल लिलाव झाले नाही.
लासलगाव येथील बस स्थानकातील बसेसचे नुकसान होऊ नये म्हणून येथून सुटणाऱ्या बसेसच्या फेऱ्या देखील बंद होत्या.लासलगाव शहरातील सर्व महाविद्यालये शाळा यांना देखील सुट्टी देण्यात आली होती.