चांदुर बाजार महावितरण कार्यालय मध्ये मध्यवर्तीय वीज बिल प्रणालीला ऑगस्ट पासून सुरुवात

0
781
Google search engine
Google search engine

ठरलेल्या कालावधीतच घ्यावे लागणार मीटर चे वाचन ,तात्काळ मिळनार वीज ग्राहकांना देयके .
मीटर वाचन एजन्सी ला लागणार का लगाम?

चांदुर बाजार:- शशिकांत निचत

महावितरना कडून ग्राहकांच्या सोईकरिता कोणत्या न कोणत्या नवीन योजना राबविल्या जात असून त्या योजना खऱ्या पण ठरत आहे. याचाच एक प्रकार म्हणजे महावितरण कडून संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र भर मध्यवर्ती वीज बिल प्रणाली राबवली जाणार आहे.याची सुरुवात ऑगस्ट महिन्यात सुरू झाली असल्याची माहिती उप कार्यकारी अभियंता सुधीर वानखडे यांनी दिली आहे.

चांदुर बाजार महावितरण उप विभागात 20 हजार ते 21 हजार वीज ग्राहक आहे. मध्य वीज बिल प्रणालीमुळे याचा सर्वात जास्त फायदा हा ग्राहकांना होणार असल्याचे दिसत आहे.तर मनमानी आणि स्वतःला अभियंता समजणाऱ्या मीटर वाचन करणाऱ्या याचा चागला फटका बसणार असल्याचे दिसत आहे.ग्राहकांना यापूर्वी वीज बिल भरणा करण्यासाठी कमी कालावधी मिळत होता. त्यामुळे वीज बिल भरणा केंद्रावर मोठ्या प्रमानात गर्दी पाहायला मिळत होती मात्र आता मध्यवर्ती वीज प्रणाली मुळे यावर अंकुश लागणार असल्याचे दिसत आहे.

वीज देयके वाटण्यासाठी शहरी भागात 48 तास तर ग्रामीण भागात 72 तासात वीज देयके वाटप करावी लागणार आहे. यामध्ये विलंब करणाऱ्या एजन्सी वर कार्यवाही शुद्ध करण्यात येणार आहे.मात्र चांदुर बाजार तालुक्यातील मागील काही दिवसापासून मीटर वाचन करणाऱ्या बद्दल मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त नागरिकडून होते आहे.त्याच्या अनेक मीटर वाचन बाबत आढळून आल्या मात्र कार्यवाही करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम सुद्धा झाले आहे.मात्र या वर उपकार्यकरी अभियंता सुधीर वानखडे कश्याप्रकरे लगाम लावतील हे पाहावे लागतील.

तर मध्यवर्ती वीज बिल प्रणालीमुळे ग्राहकांना होणार त्रास कमी होणार हे मात्र नक्की.