तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांना पंचायत समिती विभाग कडून वाचविण्याचा प्रयत्न
उच्च श्रेणी गटविकास अधिकारी विशाल शिंदे करणार का कार्यवाही?
चांदुर बाजार:-प्रतिनिधी
चांदुर बाजार तालुक्यातील काजळी येथील ग्रामपंचायत च्या अनेक तक्रारी पंचायत समिती स्तरावर झाल्या आहे मात्र या मध्ये तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांचा बचाव तर पंचायत समिती प्रसासन कडून केला जात नाही अशी चर्चा काजळी येथील ग्रामवशी यांच्या मध्ये रंगात आहे.
तसेच मुख्यालयीन फक्त दोन-तीन दिवस येणाऱ्या ग्रामविकास अधिकारी यांच्या कडून रविवारी सुट्टीच्या दिवशी माहिती अधिकारात पत्रव्यवहार झाला असतां याची विचारणा पंचायत समिती प्रसासन यांच्या कडे केली असता ओहर टाइम काम करण्यात आले असल्याचे सांगण्यात येतात.मात्र इतर कार्यलाय वेळेत हजर नसनारे कर्मचारी हे रविवार सुट्टी च्या दिवशी ओहर टाइम काम करायला कार्यालयात येताच हा एक कुतूहलाचा विषय तर ठरत आहे.त्याच बरोबर पंचायत समिती अधिकरी यांच्या कडून यांची पाठराखण करणे ही एक बाब स्वायशन तयार होते आहे.
तसेच काजळी येथील अनेक तक्रार पंचायत समिती स्तरावर झाल्या आहे एक ते दीड महिन्याच्या कालावधी उलटून गेल्यानंतर ही अधिकारी काहीच कार्यवाही करत नसल्याने उच्च श्रेणी गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांच्या वर कोणती कार्यवाही करणार हे प्रश आता चर्चा चा विषय ठरत आहे .तर अनेक प्रकरणे आपशी निकाली तर काढणार नसल्याचे चित्र पंचायत समिती विभागात तयार होते असताना दिसत आहे.