येवला येथे प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

0
792
Google search engine
Google search engine

नाशिक(प्रतिनिधी)

मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली. येवला येथे मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा आदी घोषणा देत येवला राज्य महामार्गावर वीस मिनिटेचा रास्ता रोको केला. त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढून तेथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. शहरातील रस्ते व गल्लीबोळात मराठा समाजातील तरुणांनी फेरी काढून शहरातील नागरिकांना बंदची हाक दिली. मनमाड-नगर व नाशिक-औरंगाबाद या दोन राज्य महामार्गांवरील विंचूर चौफुलीवर चक्का जामसाठी ठाण मांडल्याने पोलिस यंत्रणेसह प्रशासनाची धावपळ उडाली. विंचूर चौफुलीवर सुरू झालेल्या या आंदोलनातील तरुणांशी ज्येष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे आणि पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार यांनी चर्चा केली. त्यानंतर मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. विंचूर चौफुलीवरून शहरातील विविध मार्गावरून रॅली काढुन दुपारी साडेबाराच्या सुमारास कोपरगाव रोडवरील येवला प्रांताधिकारी कार्यालयावर रॅली पोहोचली. तेथे प्रांताधिकारी भीमराज दराडे यांना मराठा आरक्षण मागणीचे निवेदन दिले.