वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा अन्यथा तीव्र शेतकरी जन आंदोलन-प्रा.टी. पी.मुंडे(सर)

0
993
Google search engine
Google search engine

(परळी प्रतिनिधी)

पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ.आर.पी.प्रमाणे 2000 रुपये भाव द्यावा अन्यथा तीव्र शेतकरी जन आंदोलन उभारू असा
इशारा अखिल भारतीय काँग्रेसचे कार्यकारणी सदस्य तथा काँग्रेसचे सरचिटणीस प्रा.टी. पी.मुंडे(सर)यांनी केली आहे
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने मागील उसाचा हप्ता कधी 1000रुपये तर कधी 1800 रुपये काडून शेतकऱ्याची मोठी फसवणूक केली आहे. एकीकडे केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ.आर.पी.प्रमाणे हमीभाव दद्या असे सांगते तर वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना एफ.आर.पी.प्रमाणे हमीभाव देत नाही ही शेतकऱ्यांची क्रुरचेष्ट आहे.लातूर जिल्ह्यातील विकास सहकारी साखर कारखाना, मांजरा सहकारी साखर कारखाना, रेना सहकारी साखर कारखाना हे साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ.आर.पी.प्रमाणे 2300 ते 2400 प्रमाणे हमीभाव देतात या कारखान्यांना वरील हमीभाव शेतकऱ्यांना देण्यास परवडते तर मग वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला का परवडत नाही असा प्रश्न प्रा.टी .पी.मुंडे(सर)यांनी उपस्थित केला.
एकीकडे साखरेचा भाव 35 रुपये किलो आहे.शेतकरी आपल्या मुलांचे शिक्षण करू शकत नाही.आपल्या मुलीचे लग्न पैशामुळे करू शकत नाही.कारखाना वेळेवर उसाचे बील काढत नाही म्हणून शेतकऱ्यांचे संसार उदवस्थ होत आहेत.माझी शेतकऱ्यांशी बांधिलकी आहे.शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नावर मी नेहमीच आवाज उठवलेला आहे.आपलेच माणसे आपल्या रक्ताचे शोषण करीत आहेत म्हणून शेतकऱ्यांनी वेळीच सावध व्हावे असेही प्रा.मुंडे म्हणाले.
एफ.आर.पी.प्रमाणे हमीभाव मिळणे हा शेतकऱ्यांचा कायद्याने हक्क आहे कारखान्याने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. शेतकरी जर रस्त्यावर उतरला तर ती आपल्या हक्काचा हमीभाव घेतल्याशिवाय राहणार नाही येत्या 10 ते 15 दिवसाच्या आत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ.आर.पी.प्रमाणे हमीभाव न दिल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन जन आंदोलन उभा केले जाईल याची सर्वस्व जबाबदारी कारखान्याचे संचालक मंडळ व प्रशासनाची राहील असा इशारा अखिल भारतीय काँग्रेसचे कार्यकारणी सदस्य तथा प्रदेश सरचिटणीस प्रा.टी. पी.मुंडे(सर)यांनी दिला आहे