उदयाला शिवयोग कृषी शिबीर चांदुर बाजार येथे.

जाहिरात

शिवयोगी कृषी शिबीर उदयाला चांदुर बाजार येथे

११ ऑगस्ट रोजी निशुल्क शेतकरी प्रशिक्षणाचे शिबिराचे शेतकऱ्यांनी लाभ घ्या करण्यात आले आव्हान

चांदुर बाजार:-बादल डकरे

:- आज अन्नदाता बळीराजा अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करीत आहे. रासायनीक खते तसेच किटकनाशके यांच्या वापरामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी झालेली आहे. त्यामुळे शेतामध्ये उत्पन्नापेक्षा लागवडी खर्च जास्त होत आहे. यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलेला आहे. अनेक शेतकर्‍यांनी परिस्थितीसमोर गुडघे टेकवून मृत्युला कवटाळले आहे. रासायनीक खतांच्या वापरामुळे अन्नदेखील विषारी झालेले आहे. त्यामुळे मनुष्याला अनेकविविध आजारांनी घेरले आहे. शास्त्रज्ञांचे मते अशा परिस्थितीला सामोरे जाण्याचा एकमात्र उपाय आहे तो म्हणजे जैविक शेती. सद्यस्थितीत अशा गंभीर समस्येवर रामबाण उपाय सुचविणेचे मोठे आव्हान शास्त्राज्ञांसमोर उभे ठाकले आहे. पण शिवयोग मास्टर अँड कॉस्मीक सांईटीस्ट डॉ. अवधुत शिवानंदजी यांनी या गंभीर समस्येचा सामना करण्याबाबत अगदी साधा-सोपा उपाय सुचविलेला आहे. तो म्हणजे शिवयोग कृषि पद्धती. ज्याव्दारे देशाच्या खिळखिळी झालेल्या कृषि व्यवस्थेमध्ये. नवचैतन्य निर्माण केले आहे. या संबंधीच ज्ञान प्रत्येक शेतकर्‍यांना व्हाव या उद्देशाने 11 ऑगस्ट 2018 रोजी चांदुर बाजार तालुक्यातील टाऊन हॉल येथे शिवयोग कृषि पद्धतीचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. अवधुत शिवानंदजी शिवयोग स्वामी व ब्रम्हांडीय शास्त्रज्ञ आहेत. शिवयोग कृषि पध्दती ही शुन्य खर्चामध्ये अत्याधिक उत्पादन मिळविण्याची एक पद्धत आहे. ती एक दिव्य जैविक प्रक्रिया आहे. रासायनीक खजे व किटकनाशके रहीत शेती हे शिवयोग कृषि पद्धतीचे मुळ स्वरुप आहे. शिवयोग कृषि पद्धती ही शेतकरी आणि त्यांचे पशुधनासह शेतीस आरोग्य प्रदान करणारी आहे. या व्यतिरिक्त किटकांच्या संक्रमणापासून सुटका, नशामुक्त जीवन, प्राकृतीक बिजवायींची गुणवत्ता वाढवणे, खरपाड जमीन लागवडी योग्य बनविणे, मातीला रसायनांच्या विषारी प्रभावांपासुन मुक्त करण्याची हि प्रक्रिया आहे. शिवयोग कृषि पद्धतीच्या वापरामुळे शेतकर्‍यांच्या जीवनात खुप मोठा सकारात्मक बदल होत आहे. खरपाड शेतीची उत्पादन क्षमता वाढलेली आहे. फळ उत्पादनामध्ये वृध्दी होऊन शेकर्‍यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट, तिप्पटीने वाढले आहे. किटकनाशक व रासायनीक खते यावर कास्तकारांचा खुप खर्च होत होता आता रासायनीक खते व किटकनाशके यावर खर्च करण्याची गरज नसल्याने शेती लागवडीचे खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. त्यामुळे कास्तकारांचा उत्पादन खर्च कमी झाला आहे. त्याबरोबरच पीकाची गुणवत्ता आणि एकरी उत्पादन क्षमता यांच्यामध्ये वृद्धी होत असल्याने शेतकरी खुप आनंदीत आहेत. रासायनीक खते व किटकनाशके यां पासुन मुक्त असे अन्न मिळत असल्यामुळे सर्वांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होत आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्यात सुध्दा अप्रत्यक्षरित्या सहायता होत आहे. वन्यप्राणी शेतकर्‍यांची पीके उध्वस्त करीत असतात परंतु शिवयोग कृषि पद्धती मुळे आता शेतातील पीकांना वन्यप्राण्यांचा उपद्रव राहीलेला नाही. तसेच शिवयोग कृषि पद्धतीचा अवलंब करणार्‍या कास्तकारांच्या शेतीचे नैसर्गीक आपत्तीपासुन रक्षण होते. देशाच्या विविध क्षेतांतील असे अनेक शेतकरी आहेत. ज्यांनी शिवयोग कृषि पद्धतीचा अवलंब केल्याने आपल्या जीवनात सुखसमृद्धी आल्याचा अनुभव घेतला आहे. शिवयोग कृषि शिबिर चा तालुक्यातील शेतकरी वर्ग यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आव्हान आयोजक यांनी केले आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।