नळाच्या पाण्यातून लाल अळ्या सुरूच – दूषित पाण्याने शहरवासी त्रस्त

0
741

अकोट/संतोष विणके- गेल्या काही दिवसांपासून अकोट शहरातील विविध भागातून नळातील पाण्यातून लाल अळ्या येत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत दूषित पाण्याची ही समस्या कायम असुन काल तथा आजही शहराच्या विविध भागात नळाच्या पाण्यातून लाल अळ्या येत असल्याचे प्रकार समोर आलेआहेत. दूषित पाण्याच्या या समस्येने जनता त्रस्त झालेली असून प्रशासन ढिम्मपणे सर्व प्रकार घडतांना पाहते आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील काही भागांना काल दि.९ अॉगस्ट ला पाणीपुरवठा करण्यात आला असता नळातून लाल अळ्या येत असल्याचा प्रकार पुन्हा निदर्शनास आला काल दिनांक 9 ऑगस्ट ला आसरा कॉलनी परिसरात नळाच्या पाण्यातून लाल अळ्या येत असल्याचा प्रकार अक्षय जायले यांना घरी पाणी भरत असताना निदर्शनास आला. संबंधित प्रकाराचा फोटो तथा व्हिडिओ ही त्यांनी काढला कालचा हा प्रकार संपत नाही तोच दिनांक 10 ऑगस्टला सकाळी सराफ लाइन ,जवाहर रोड भागातील नळातील पाण्यातून लाल अळ्या येत असल्याचा प्रकार घडला.या परिसरातील नागरिकांनी त्यांच्या मोबाईल मध्ये लाल अळीच्या दूषित पाण्याचे फोटो व्हिडिओ घेतला. एवढ्या मोठ्या प्रमाणात दूषित पाण्याचा पुरवठा होत असताना प्रशासन नागरिकांच्या जिवाशी बरेवाईट होण्याची वाट पाहते आहे का असा संतप्त सवाल जनता विचारत आहे. या प्रश्नावर शिवसेनेचे नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती मनीष कराळे यांनी प्रशासनाला धारेवर धरले असतानाही प्रशासन जनतेच्या जीवाशी खेळत आहे .पाणीपुरवठा देयकांची वसुली करणारे जीवन प्राधिकरण सेवा देताना मात्र ढीम्म ठरत आहे .शहरात ठिकठिकाणी कचरा व घाण ही ढिगारे ही नागरिकांच्या जिवावर उठत आहे. एकंदरीतच प्रशासन मूकपणे हे सर्व पाहत आहे तर जनता ञस्त आहे.