आंदोलन पवित्रा मुळे पुन्हा सुरू झाले शी.कसबा येथील जलयुक्त शिवार काम

0
974

👉🏻सुरू असलेल्या जलयुक्त शिवार यांचे काम प्रशासकीय अधिकारी यांच्या फोनवरून बंद झाल्याने शेतकरी यांचे नाला खोलीकरण ठिकाणीच आंदोलन,

👉🏻लेखी आश्वासन दिले जात नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार शेतकरी यांची आक्रमक भूमिका.लेखी आश्वासन नंतर आंदोलन मागे
प्रतिनिधी :-शिरजगाव कसबा

चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा या ठिकाणी सुरू असलेले काम अचानक दिनांक 8 ऑगस्ट ला बंद पडल्याने शेतकरी वर्ग यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर रोष पाहायला मिळाला आहे.त्या संदर्भात त्यांनी अचलपूर उपविभागीय अधिकारी यांना काम सुरू करण्यासाठी चे निवेदन दिले.जो पर्यत काम सुरू होणार नाही तो पर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे भूमिका शेतकरी वर्ग यांनी घेतली आहे.तर संपामुळे काम बंद केले असल्याची माहिती मध्यम व लघुपाटबंधरे विभाग अचलपूर अधिकारी किशोर पाचखडे यांनी सांगितले.
तर अधिकारी यांच्या भेटी नंतर आनि लेखी आश्वासन पुन्हा कामाला सुरुवात झाली.