4 गौवंश यांची चांदुर बाजार पोलिसांनी केली सुखरूप सुटका

0
1300
Google search engine
Google search engine

👉🏻अवैध गौवंश तस्करी चा डाव चांदुर बाजार पोलिसांनी लावला उधळून

👉🏻आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल तर 4 गौवंश यांची सुखरूप सुटका

चांदुर बाजार :-बादल डकरे

चांदुर बाजार पोलिसांना मिळालेल्या विशेष गोपनीय माहिती च्या आधारे आज सकाळी ब्राम्हणवाडा थडी वरून चांदुर बाजार च्या दिसेने एक इंडिका गाडी मध्ये गौवंश यांची वाहतूक होते आहे. चांदुर बाजार पोलिसांनी ब्राम्हणवाडा थडी टी पॉईंट वर सापळा रचला असता गाडी चालक यांना भनक लागल्याने पोलीस समोर दिसताच त्यांनी गाडी मधून उतरून फरार झाले.
चांदुर बाजार पोलिसांनी या कार्यवाही इंडिका कार क्र MH 04 C B 1586 मध्ये तीन बैल आणि एक गाय असे एकूण चार जनावरे ताब्यात घेऊन त्याची सुखरूप सुटका केली. या इंडिका गाडी मध्ये कोंबून जनावर यांची वाहतूक होत होती.या मध्ये अज्ञात आरोपी विरूद्ध गोवंश हत्या व छळ प्रतिबंधक तसेच मो.वा कायद्यानवये गुन्हची नोंद करण्यात आली.ही कार्यवाही ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी नाईक पोलिस कॉस्टबल निकेश नशीबकर यांनी केली. गुन्हा दाखल करून तपास करण्यात येत आहे.

*मात्र ब्राम्हणवाडा थडी या ठिकाणी पोलीस स्टेशन असून याची माहिती त्यांना सुद्धा कशी लागली नाही हा प्रश्न आहे.तर अवैध जनावर वाहतूक प्रकरणात नवीन फंडे वापरून जनावर यांची वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा मार्गावर अवैध जनावर तस्करी करणारे दिसत आहे*.*