जळगाव / विशेष प्रतिनिधी –
के.सी.ई. सोसायटी च्या गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम शाळेच्या मुख्या.सौ.रेखा पाटील यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
दीप अमावस्या दीप पूजनाचा दीप पूजनाचा दिवस अज्ञानरुपी अंध:काराचा नाश करून हा दीप आपले जीवन सर्वार्थाने उजळो हीच प्रार्थना अशा शब्दात मुख्या रेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांना दीप अमावस्येच्या महत्व पटवून दिले.
विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे दिवे याठिकाणी वापरले सुन्दर अशा पिवळ्या , लाल फुलांच्या रांगोळीमध्ये चमचममणाऱ्या दिव्यांची आरास मांडून मनमोहक असे वातावरण तयार केले.
कार्यक्रमाचे आयोजन सौ.इंदू चौधरी व आर.व्ही.पाटील यांनी केले.प्रसंगी उपशिक्षक श्री.योगेश भालेराव , धनश्री फालक , सुधीर वाणी , कल्पना तायडे , सरला पाटील , सुनील नारखेडे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.