परळी येथे श्रावणमासा निमित्त राष्ट्रसंत  डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचा  ८२ वा तपोनुष्ठान सोहळा

0
1855
Google search engine
Google search engine

 

८२ वा तपोनुष्ठान सोहळा

पाच हजार परमरहस्य ग्रंथ पारायण सोहळ्यास प्रारंभ

बीड,परळी वैजनाथ : नितीन ढाकणे 

परळी येथे श्रावणमासा निमित्त राष्ट्रसंत  डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचा  ८२ वा तपोनुष्ठान सोहळा तसेच अखंड शिवनाम सप्ताह व पाच हजार परमरहस्य ग्रंथ पारायण सोहळ्यास आजपासून प्रभू वैद्यनाथाच्या पवित्र भूमित उत्साहात सुरूवात झाली. सोहळ्याला प्रारंभ होण्यापूर्वी सकाळी ११ वा. विद्यानगर भागातील शंभू महादेव मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली यावेळी राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी भेट दिली. भव्य अशा रथातून शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची शोभायात्रा काढण्यात आली आहे. उंट, घोडे, भगवे झेंडे या सर्वांनी सर्व परिसर प्रसन्न दिसत असून . शहरात ठिकठिकाणी रांगोळ्या साकारून शोभयात्रेचे स्वागत करण्यात येत आहे. समाजातील महिलांनी डोक्यावर कलश व हाती ढोल घेतले आहेत. अनेक महिला व पुरुष या शोभायात्रेत सहभागी झाले असून,

शोभायात्रेत महिलांचे ढोल पथक होते. टाळ मृदंग आणि गुरुराज माऊली, हर हर महादेव च्या जयघोषात सहभागी भाविक महिलांच्या साथीने हरिनामाचा ठेका धरला. या मध्ये ढोल वाजवत महिला ढोल पथकाचा उत्साह वाढवला.