ना. पंकजाताई मुंडे यांनी केली जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाची पाहणी

0
628
Google search engine
Google search engine

 

जलदगतीने काम पूर्ण करण्याच्या अधिका-यांना दिल्या सूचना

बीड :नितीन ढाकणे

दि. १३ —— राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाला भेट देवून पाहणी केली, इमारतीचे बांधकाम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिका-यांना केल्या.

जिल्हयाचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणा-या जिल्हा परिषदेला पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे नवीन प्रशासकीय इमारत मिळाली आहे, ग्रामविकास विभागाने ३८ कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करून दिला असून अंतर्गत फर्निचरसाठी देखील पाच कोटी रूपये दिले आहेत. या निधीतून तीन मजली सुसज्ज व सर्व सोयींनी युक्त अशी इमारत सध्या उभी राहत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाची पाहणी केली. ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी ही इमारत लवकरात लवकर पूर्ण करावी अशी सूचना त्यांनी केली.

ना. पंकजाताई मुंडे यांच्या समवेत कामाची पाहणी करताना आ. आर. टी. देशमुख, आ. संगीता ठोंबरे, माजी आमदार बदामराव पंडित, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, धनराज निला, बांधकाम सभापती युध्दजित पंडित, समाजकल्याण सभापती संतोष हंगे आदीसह अधिकारी यावेळी उपस्थित होते.