चांदुर बाजार तालुक्यात चक्री मिटर मुळे महावितरण ला फटका

0
988
Google search engine
Google search engine

चक्री मीटर द्वारे चांदुर बाजार तालुक्यात वाढले वीज चोरी ची संख्या
महावितरण कार्यलाय ला बसत आहे जोरदार फटका,अधिकरी करणार का कार्यवाही?

चांदुर बाजार:-प्रतिनिधी बादल डकरे

चांदुर बाजार उपविभागीय कार्यलाय अंतर्गत एकूण 25 हजार च्या वर महावितरण ग्राहकांची संख्या आहे.यामध्ये घाटलाडकी,तळवेल, ब्राम्हणवाडा थडी,शिरजगाव बंड, चांदुर बाजार शहर,असे त्याचे सेंटर आहे.तर या सर्व सेंटर वर25% ते 30% च्या वर चक्री चे मीटर आहे.त्यामुळे वीज चोरी करणारे याना त्याचा चांगला फायदा घेत आहे.उर्जामंत्रालाय ऊर्जा बचत साठी नवीन नवीन उपाय काढत आहे तर चक्री च्या मीटर मुळं मोठ्या प्रमाणावर वीज चोरी चांदुर बाजार तालुक्यात शहर आणि ग्रामीण भागात होते आहे.
वीज वितरण कंपनीला वीज चोरीमुळे फटका सहन करावा लागतो. अनेकदा ग्राहकांकडून मीटरमध्ये तांत्रिक बिघाड करून रिडींग कमी करण्याचे प्रकार घडतात. यामुळे देयक कमी होते. यात महावितरणला नुकसान सोसावे लागते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी घरोघरी इन्फ्रारेड मीटर लावण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती मात्र आपला उद्देश साध्य व्हावा यासाठी काही ग्राहकांनी आपले चक्री चे मीटर बदलू दिलेच नाही यांचा फायदा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात होत आहे.
वीज चोरीवर आळा घालण्यासाठी महावितरण कंपनीच्यावतीने विविध उपाययोजना आखल्या जातात. तरीही वीज चोरी व विजेचा तुटवडा कायम आहे. महामंडळाच्यावतीने विद्युत ग्राहकांच्या घरी चुंबकीय तत्वावर आधारित वीज मीटर लावण्यात आले होते. या मिटरमध्ये असलेली चक्री विशिष्ट वेळ फिरल्यानंतर एक एक युनिट वीज वापरल्याचे ग्राह्य धरले जात होते. त्यानुसार ग्राहकांना वीज देयक दिले जात होते. यांत्रिकी पद्धतीवर आधारित या वीज मीटरमध्ये हेराफेरी करण्याचे प्रमाण वाढले होेते. विद्युत मंडळाचे सील लावले जात असले, तरी क्लृप्त्या वापरून वीज मीटरमध्ये हेराफेरी होत असल्याचे प्रकार समोर आले आहे. याचा फटका महावितरणला सहन करावा लागत असल्याने जुने मीटर काढून रिडींगमध्ये पारदर्शक मीटर कधी लावले जाणार?अशा प्रश्न आहे.