कामगार कल्याण केंद्रात ध्वजारोहण

0
721
Google search engine
Google search engine

बीड :परळी, नितीन ढाकणे

येथील कामगार कल्याण केंद्रात ७२ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेस वीरभद्रेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर गिरवलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून स्कॉलर केजी स्कूलच्या मुख्याध्यापिका सुजाता फुटके, केंद्र संचालक आरेफ शेख आदी उपस्थित होते.
मोठ्या उत्साहात ध्वजारोहण पार पडले. पाहुण्यांनी स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान लहान बालकांनी राष्ट्रभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी शिरीष जाधव, उमा ताटे, सोनम गव्हाणे, भगवान मंडलीक, गंगाधर कांबळे, मसरत खान, शिवबस खराडे, चंद्रशेखर फुटके, प्रवीण भारती, माधुरी यलगंद्रेवार, अनुराधा पांडकर, कविता गायकवाड, रेखा शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.