परळीच्या सर्वेश नावंदे याची रशियाच्या दौऱ्यासाठी निवड

0
854
Google search engine
Google search engine

बीड परळी वैजनाथ:नितीन ढाकणे

रशियन सुरक्षा यंत्रणा आणि त्यांच्या संरक्षण खात्यातील अद्ययावत टेक्नॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी भारतातून 25 युवकांच्या शिष्टमंडळाची निवड करण्यात आली आहे. देशातील एन.सी.सी.च्या 14 लाख कॅडेट मधून राष्ट्रीय स्तरावर एअर विंग मध्ये सर्वोत्तम कॅडेट म्हणून यापूर्वी सर्वेश नावंदे याची निवड झाली होती. या अभ्यास दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून निवड झालेला सर्वेश हा एकमेव युवक आहे.सर्वेेश नावंदे हा परळी तालुक्यातील परचुंडी गावचा रहिवाशी आहे.

18 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत हा दौरा रशिया या देशात असणार आहे. सर्वेश 19 वर्षाचा असून तो मॉर्डन कॉलेज, गणेश खिंड, पुणे येथे बी.एस.सी.तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. त्याचे 1 ली ते 12 पर्यंतचे शालेय शिक्षण विखे पाटील मेमोरियल स्कुल पुणे येथे झाले आहे. सर्वेशचे आई, वडिल हे दोघेही क्रीडा खात्यात उच्च पदावर कार्यरत आहेत. वडील सुभाष नावंदे हे तालुका क्रीडा अधिकारी, आंबेगाव, पुणे तर सौ.कविता नावंदे-निंबाळकर या क्रीडा मंत्री विनोद तावडे यांचेकडे मंत्रालय मुंबई येथे क्रीडा विभागाचे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मोठा भाऊ समाजिक कार्यकर्ता आहे. या दोन्ही भावंडांना घरातूनच देश सेवा व सामाजिक बांधिलकीचे लहानपणापासूनच बाळकडू/धडे दिले गेले आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनालच्या निमित्ताने पंतप्रधान रॅलीमध्ये परळीच्या सर्वेश सुभाष नावंदे 26 जानेवारी 2018 रोजी सहभागी झाला होता. यास भारतातून एअरफोर्स विंग मध्ये बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते. त्या गुणवत्तेवरून आज त्याचे भारत व रशिया या दोन देशातील युवकांचे युथ एक्सचेंज प्रोग्रामसाठी निवड झाली आहे.

भारत रशिया युवक आदान प्रदान कार्यक्रमाविषयी अधिक माहिती

भारत आणि रशियाचे आंतरराष्ट्रीय संबंध जुने आहेत. ते आणखी दृढ करण्यासाठी हा कार्यक्रम एक महत्वाची भूमिका बजावतो. या कार्यक्रमातून दोन्ही देशाच्या तंत्रज्ञानाचे आदान प्रदान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्रातील रशियन तंत्रज्ञान अद्ययावत आणि सक्षम आहे. या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी या तरूणांना या अभ्यास दौऱ्यासाठी भारताच्या वतिने पाठविले जाते. या प्रोग्रॅमसाठी भारतातून 25 युवकांची निवड झाली त्यात महाराष्ट्रातून सर्वेश एकमेव युवक आहे.

सध्या याबाबत सर्वेश नावंदे पूर्व प्रशिक्षणासाठी करिअप्पा परेड ग्राउंड दिल्ली येथे सराव करीत आहे. दि.18 ऑगस्ट रोजी पूर्ण 25 जणांचा संघ रशिया येथे रवाना होणार आहे. त्यासाठी परळीच्या नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, जेष्ठ नेते विजयकुमार मेनकुदळे, वीरशैव महासभेचे जिल्हाध्यक्ष दत्ताप्पा ईटक गुरूजी, माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे, भाजपा शहर उपाध्यक्ष महादेव इटके,वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख, चेतन सौंदळे,गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी, अशोक भातांब्रेकर,आदर्श शिक्षक अशोक नावंदे, प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे, चनबसअप्पा गिरवलकर, उमाकांत काळे, पत्रकार ओमप्रकाश बुरांडे, संजय खाकरे, संतोष जुजगर आदींनी अभिनंदन केले आहे.