लेफ्टनंट सुनील डोबाळे आकोट तालुक्याचे भुषण : तहसीलदार विश्वनाथ घुगे

0
1858
Google search engine
Google search engine

भुमीच्या वृक्ष दत्तक योजनेअंतर्गत तहसीलदार व ठाणेदारांच्या हस्ते ताजनापुर येथे वृक्षारोपण

अकोट (संतोष विणके) – लष्करी सेवेत सुभेदार मेजर पदावरून लेफ्टनंट पदावर नुकतेच बढती झालेले लेफ्टनंट सूनील डोबाळे अकोट तालुक्याचे भुषण आहेत लष्करी सेवेत राहून त्यांनी दक्षिण आफ्रिका श्रीलंका यासह डझन भरा पेक्षा जास्त देशात आपली सेवा दिली त्यामुळे अकोटच्या मातीचा सुगंध हा संपूर्ण जगात दरवळला लेफ्टनंट सूनील डोबाळे यांच्यामुळे दरवळला यात शंका नाही असे गौरवोद्गार स्वातंत्र्यदिन पर्वावर तहसीलदार घुगे यांनी ताजनापूर येथे आयोजित वृक्षारोपण तथा आदर्श गाव मोहीम उपक्रमाचा शुभारंभप्रसंगी काढले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन शेळके सत्कारमूर्ती लेफ्टनंट सुनील डोबाळे,प्रीती गजानन शेळके सरपंच प्रतिभा मेंढे, पोलीस पाटील वर्षा डोबाळे भूमीच्या चंचल पितांबर वाले यांची मंचावर उपस्थिती होती. जिल्हा परिषद शाळेत झालेल्या कार्यक्रमात गावकऱ्यांच्या वतीने सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ पुष्पहाराने स्वागत करण्यात आले .त्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते लेफ्टनंट सुनील डोबाळे यांना मिळालेल्या गौरवास्पद बढती निमित्ताने त्यांचा शाल श्रीफळ पुष्पहार व पुष्पगुच्छ देत जाहीर सत्कार करण्यात आला

या सत्कार प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले ताजनापुर सारख्या लहान गावातून एवढ्या मोठ्या पदावर आपण पोहोचलो ते प्रचंड मेहनत आई-वडिलांचे संस्कार गावकऱ्यांच्या प्रेमामुळेच ज्या काळात सायकल सुद्धा नव्हती तो आज विमानांमध्ये विदेशात जातो हे शक्य झाले आहे ते कठोर परिश्रम आणि तिने मला संघर्ष दिला सन्मान दिला म्हणून मी माझे गाव आदर्श गाव बनविण्यासाठी प्रयत्न करणार आहे .यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून अकोट शहर ठाणेदार गजानन शेळके यांनी डोबाळे साहेब आम्हाला कायम प्रेरणा देणारा वाटतात असे म्हटले त्यांचे गावा विषयीचे प्रेम हे नेहमीच दिसून येते जी व्यक्ती नावापुढे ताजनापुरकर असे अभिमानाने बिरुद लावते त्यांचे गाव सुधारायची तळमळ ही कुठल्या राष्ट्रभक्ती पेक्षा कमी नाही असे गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार अढाऊ ,मांडवे गुरुजी यांनी तर आभारप्रदर्शन पत्रकार संतोष विणके यांनी मानले. कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी तरुण मंडळी या पंचक्रोशीतील चंडिकापूर ताजनापुर वडाळी या गावातून गावकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी भूमी फाऊंडेशनचे तुषार अढाऊ संतोष विणके पंकज आंबुलकर अमोल पवार सुदाम राजदे योगेश वर्मा यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर गावातील मुख्य मार्गावर विविध ठिकाणी गावकरी मान्यवर पाहुणे विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्ष संगोपनासाठी दत्तक देण्यात आले अभूतपूर्व यशस्वी झालेल्या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील गावकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल डोबाळे यांनी विशेष परीश्रम घेतले.

भूमी फाऊंडेशन ची दरवर्षी प्रमाणे २०१८ला सुध्दा भूमी वृक्ष दत्तक योजना १आँगस्ट ते ३१आँगस्ट या कालावधीत राबविण्यात येत आहे.वृक्ष दत्तक व वृक्ष सर्वधंन योजना भूमी फाऊंडेशन च्या माध्यमातून २०१२पासुन राबवित आहेत.भूमीच्या वतिने आत्ता पर्यत वृक्ष दत्तक देऊन १७६५वृक्षाची नोंद आहे.