शाळेच्या कुंपणावरून डोकावल्या अन उघडले शिक्षणाचे दार.

0
721
Google search engine
Google search engine

निफाड :- समाधान कोकाटे

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची तयारी पीबीएस गुरुकुल मध्ये सुरु असतांना शाळेच्या कुंपणावरून त्या चार मजुराच्या मुली औत्सुक्याने बघत होत्या..शिक्षण अन शाळा म्हणजे काय अन हा क्षण आपल्या आयुष्यात कधी येणार या विवंचनेत. आणि जादूची कांडी फिरावी तसा योग जुळून आला तो स्वातंत्र्य दिनी.
मनाचा दिलदारपणा दाखवत या चार लेकींच्या यापुढील सर्व शिक्षणाची जवाबदारी प्रज्ञा फौंडेशनचे संस्थापक भागवतराव सोनवणे यांनी उचलल्याने या गरीबाच्या घरात खर्या अर्थाने स्वातंत्र्य दिन उजाडला…पोटाची खळगी भरण्यासाठी परतूर (जि.जालना) येथून आशामती थिटे आणि दादाराव थिटे हे जोडपं तालुक्यातील कोटमगाव येथे पीबीएस गुरुकुल या शाळेजवळील शेतात शेतमजूर म्हणून राहत आहेत. त्यांच्या चारही मुली शाळाबाह्य आहेत.

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची तयारी पीबीएस गुरुकुल शाळेच्या कुंपणावरून बघत होत्या.ही बाब शाळेच्या शिक्षकांनी संस्थेचे अध्यक्ष भागवतराव सोनवणे यांच्या लक्षात आणून दिली.सोनवणे यांनी या मुलींच्या कुटुंबाची चौकशी करून तत्काळ शाळाबाह्य असलेल्या वनिता थिटे आणि वैष्णवी थिटे आपल्या शाळेत विनाशुल्क प्रवेश दिला.

अजूनही शाळेत न गेलेल्या गायत्री (वय ६) आणि भाग्यश्री (वय ४) यांच्या हाती स्वातंत्र्य दिनी पाटी दप्तर आणि नवे कपडे मिळाले व त्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली.जो पर्यंत या मुली येवल्यात असेल तो पर्यंत त्यांचा शिक्षणाचा खर्च सोनवणे हे करणार आहेत.
स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात भाग्यश्री, गायत्री आणि वैष्णवी यांना शाळेचे दप्तर, गणवेश देण्यात आले.ध्वजारोहण प्रमुख अतिथी सेवानिवृत्त सैनिक नामदेव बेंडके यांच्या हस्ते करण्यात आले*.
प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ महाजन,व्यवस्थापकीय संचालक सुनील वाघ, मार्गदर्शक डी.पी.गायकवाड, प्राचार्य टी.बी.लासुरे, शिक्षिका पी.एन.बच्छाव, के.डी.काळे,डी.एस. कोटमे यासह पालक ध्वजारोहनास उपस्थित होते.

“लेक वाचवा,लेक शिकवा.. हा सामाजिक नारा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सर्वच झटतात.मात्र वंचितांच्या शिक्षणाची संधी मी उपलब्ध करून देऊ शकलो,हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे.या मुलींच्या शिक्षणासाठी मी सर्वतोपरी सहकार्य करेल.”
भागवतराव सोनवणे,
अध्यक्ष,पीबीएस गुरुकुल