*अटलजीनी देशाला कणखर नेतृत्व दिले – आ डॉ अनिल बोंडे >< आमदार बोंडेनी मोर्शी-वरुड विधानसभा मतदार संघाच्या वतीने दिली श्रद्धांजली*

0
869
Google search engine
Google search engine

वरुड :-

बाधाएँ आती है आएँ, घिरे प्रलय की घोर घटाएँ, पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाएँ, निज हाथों में हँसते-हँसते, आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा…

या आपल्या कवितेप्रमाणेच, प्रत्येक संकटाशी न डगमगता लढलेले, सत्तेचा मोह न बाळगता हसत-हसत राजीनामा देण्याचं धारिष्ट्य दाखवलेले आणि एक-दोन नव्हे तर तब्बल 22 पक्षांसोबत ‘कदम मिलाकर’ सरकार चालवलेले देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन झालं आहे. त्यांच्या जाण्यानं देशाच्या राजकीय इतिहासातील ‘अटल’ अध्यायाची सांगता झाल्याची भावना व्यक्त होतेय. माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयींचं वयाच्या 93व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केंद्र सरकारने संपूर्ण भारतात सात दिवसांचा दुखवटा जाहीर केलाय. वाजपेयीजीना श्रद्धांजली देण्याकरिता वरुड शहरातील यावलकर सभागृहात अंत्यसंस्कारचे थेट प्रक्षेपण एलईडी वर दाखविण्यात आले व श्रद्धांजली देण्यात आली.

सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे,आदरणीय व्यक्तीमत्त्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहिले गेले. देशाचे परराष्ट्र धोरण,संरक्षणापासून ते ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांपर्यंत प्रत्येक बाबतीत रुची असणारे वाजपेयी यांनी बिगरकॉंग्रेसी पंतप्रधान या नात्याने आपल्या कार्यकर्तृत्वाची मुद्रा देशाच्या राजकारणावर उमटवली. चीनशी जवळीक, पाकिस्तानशी मैत्रीचे प्रयत्न आणि कारगिलसारखे दुःसाहस पाकिस्तानने केल्यानंतर त्यांना धूळ चारण्यासही वाजपेयींनी मागे पाहिले नाही. देशाची आण्विक क्षमता सिद्ध करतानाच विकासालाही चालना दिली. त्यांच्या जिवनातील अश्या अणेक गौरवशाली जिवनपटावर श्रद्धांजली वाहतांनी मोर्शी-वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ अनिल बोंडे यांनी राजकीय जीवनावर प्रकाश टाकला डॉ सौ. वसुधा बोंडे तर देवेंद्र बोडखे, मोरेश्वर वानखडे, संतोष निमगरे, किशोर खंडेलवाल यांच्यासह अनेकांनी शब्दसुमनाने श्रद्धांजली वाहली. यावेळी “अटल बिहारी वाजपेयीजी, अमर रहे..अमर रहे…, भारत माता कि..जय…. अश्या घोषना देण्यात आल्या. यावेळी आमदार डॉ अनिल बोंडे, डॉ सौ, वसुधा बोंडे, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष देवेंद्र बोडखे, शहराध्यक्ष नरेंद्र फसाटे, पंचायत समिती सदस्या व महिला भाजपा जिल्हाअध्यक्ष सौ अंजली तुमराम, वरुड शहर नगराध्यक्ष स्वाती आंडे, पंचायत समिती सदस्या सौ.चैताली ठाकरे, पंचायत समिती सदस्या सौ.ललिता लांडगे, विजय गुल्हाने, जगदीश उपाध्याय, कैलाश उपाध्याय, दीपक पवार, गणेश शेकापुरे,नितीन निस्वादे, युवराज आंडे, जेठानंद बाशानी, डॉ नितीन वानखडे, बबनराव वडस्कर, डॉ अमोल कोहळे, शेघाट नगरसेवक मंदा वसुले, सारिका बेलसरे, नीलिमा कांडलकर, डोईजोड, वरुडच्या नगरसेविका नलिनी रक्षे, महिला तालुकाध्यक्ष ज्योती कुकडे, महिला शहराध्यक्ष माधुरी भगत, रुपाली सोंडे, लीना अकर्ते, नगर परिषद उपाध्यक्ष हरीश कानुगो, कृ.बा.स.संचालक मोरेश्वर वानखडे, शशिकांत उमेकर, तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रितेश शहा, इंद्रभूषण सोंडे, शैलेश अकर्ते, तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष स्वप्नील मांडळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मनोज माहुलकर, शहरध्यक्ष निलेश अधव, जिल्हाउपाध्यक्ष रविराज पुरी, अल्पसंख्याक आघाडीचे मो. शाकीब, असिफ खान, कल्याण कोटेजा, किशोर खंडेलवाल, योगेश तुमराम, सुरेश इंगळे, वरुड, नगरसेवक संतोष निमगरे, चंदू कडू, नंदकिशोर आजनकर, रिंकेश राजस, अशफाक शहा, संजय लव्हाळे, रामा खोडे, सुधाकरर घोरमाडे, मारोती घारड, मनीष विटाळकर, शशिभूषण उमेकर, मनोज देशमुख, मारोती पवार, स्वप्नील चौधरी, प्रशांत गणोरकर, दिलीप खेरडे, भारत खासबागे, रेखा काळे, राहुल पाटील, दादाजी कोठे, सुनील क्षीरसागर, किशोर गोडे, गजू ढोके, संदीप बरथे, गुड्डू बरथे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच असंख्य नागरिकांनी माननीय माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या अंत्यविधीचे एलईडी वर थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले व श्रद्धांजली वाहली.