चांदुर बाजार येथील वीरचक्र प्राप्त दादारावजी घोडेस्वार यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंची उपस्थिती – शासकीय इतमामात पार पडला अंत्यसंस्कार

0
1932
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार / बादल डकरे-

विरपुत्र दादरावजी घोडेस्वार अनंतात विलीन

चांदुर बाजार तालुक्यातील रहिवाशी असलेले दादारावजी घोडेस्वार यांचे दिनांक 17 ऑगस्ट ला दुपारी 2 ते 2.30 दरम्यान दीर्घ आजाराने आणि वृद्धपकाळाने निधन झाले दादारावजी घोडेस्वार हे वयाच्या 17 वर्षी भारतीय लष्करात भर्ती झाले होते त्यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान, भारत विरुद्ध चीन,भारत विरुद्ध पाकिस्तान अश्या तीन युद्धामध्ये आपली कामगिरी पार पाडली.

12 डिसेंबर 1971 च्या रात्री च्या सुमारास भारत पाकिस्तान युद्धच्यावेळी राजस्थान येथे एक प्लाटून चे नेतृत्व दादाराव घोडेस्वार यांच्या कडे होते. शत्रू यानी तयार केलेली 600 मीटर असलेली सुरग त्यानी पार केली ठराविक लक्ष प्राप्त करण्यापूर्वी शत्रू नि जबानी हमला सुद्धा केला.मात्र हार मानणार ते दादाराव घोडेस्वार नव्हते त्यांनी परिस्थिती चा सामना करून शत्रू ना माघार घेण्यास भाग पाडले.आणि दारू गोळा संपला असताना ही त्यांनी बंदूक समोरील कट्यार ने दुश्मन शत्रू चा खात्मा केला.त्यांच्या या विरते बद्दल त्यांना त्याच दिवशी वीर चक्र घोषित करण्यात आले तर याचे वितरण त्यांना 15 ऑगस्ट 1972 ला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्यावेळचे राष्ट्रपती श्री वि.वि.गिरी यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला होता.
मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती अस्थिर होती. त्यामुळे ते घरीच आराम करत होते.मात्र प्रकृती चिंताजनक होत असताना दिनांक 17 ऑगस्ट ला प्राणजोत मावळली. याची माहिती मिळताच आज दिनांक 18 ला ठाणेदार श्री अजय आकरे,तहसीलदार शिल्पा बोबडे,अचलपूर मतदार संघाचे आमदार श्री बच्चू कडू,कॉग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बबलू भाऊ देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरावती सुरेखाताई ठाकरे यांनी सकाळी त्याच्या निवासस्थानी येवून श्रद्धांजली वाहिली. यावेळी तालुक्यातील अनेक नागरिक आणि माजी सैनिक उपस्थित होते.यावेळी माजी सैनिक यांनी दादारावजी घोडेस्वार यांच्या अंतिम संस्कार शासकीय इतमात करण्याची मागणी आमदार कडू यांच्या कडे केली.आमदार कडू यांनी जिल्हा प्रशासन,जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत फोनवरून संपर्क करून दादारावजी घोडेस्वार यांच्या अंतिम संस्कार शासकीय इतमात करण्याची मागणी केली. आमदार बच्चू कडू याच्या मागणी ला सकारात्मक उत्तर मिळाले आणि अखेर अमरावती ग्रामीण पोलिस दलाच्या पथकाने विरचक्र प्राप्त घोडेस्वार यांचं श्रद्धांजली वाहिली.यावेळी पुलगाव येथील भारतीय सैन्याचे अधिकारी यांनी सुद्धा श्रद्धांजली वाहिली.

तर तिरंगा या पोलीस उपनिरीक्षक शरद भस्मे यांच्या हस्ते दादारावजी घोडेस्वार याच्या पत्नी ला सोपविनायत आल्या.यावेळी अनेक शासकीय प्रतिनिधी आणि राजकारण मधील नेते मंडळी उपस्थिती होते.तर दादारावजी घोडेस्वार यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे तर दादरावजी घोडेस्वार याना अग्नी त्याच्या मुलाने दिली.याच्या आधी शासकीय प्रतिनिधी म्हणून तहसीलदार बोबडे,आमदार कडू यांनी श्रद्धांजली वाहिली..