लासलगाव वनस्थळी केंद्रात इकोफ्रेंडली श्रीगणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न

0
1191
Google search engine
Google search engine

लासलगाव(प्रतिनिधी)

वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र, लासलगाव शाखेच्या वतीने पर्यावरण पूरक, शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची एक दिवशीय इकोफ्रेंडली श्रीगणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न झाली. नाशिक येथून आलेल्या संजीवनी लोहारकर यांनी प्रात्यक्षिकाद्वारे गणेशमूर्ती निर्मिती करण्यास, कार्यशाळेतील सहभागींना शिकवले. प्रारंभी वनस्थळीच्या समन्वयक अनिता गंधे यांनी गणेश स्तोत्राने कार्यशाळेची सुरुवात केली. याप्रसंगी प्रतिभा कुलकर्णी, सुलक्षणा पुराणिक, प्रा.शिरीष गंधे उपस्थित होते.
वनस्थळी लासलगाव केंद्र हे दरवर्षी लासलगाव शहर व परिसरात इकोफ्रेंडली गणेश उत्सव साजरा व्हावा यासाठी प्रयत्न करत असते. यासाठी दरवर्षी जनजागृतीसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याचबरोबर पत्रकांद्वारे देखील समाजप्रबोधन करण्याचे काम वनस्थळी केंद्राच्या प्रमुख अनिता गंधे व प्राध्यापक शिरीष गंधे यांच्या अविरत पणे सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून लासलगाव येथील वनस्थळी केंद्रात शाडो माती पासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा संपन्न झाली. यासाठी नाशिक येथील संजीवनी लोहारकर यांनी वनस्थळी केंद्रातील महिला व इतर सहभागी झालेल्या सदस्यांना प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी शाडो माती पासून विविध प्रकारच्या गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या.

या कार्यशाळेत वैशाली होळकर, मनीषा होळकर, सीमा कुलकर्णी, ज्योती कुमावत, नीता होळकर, अर्चना वडनेरे, धनश्री केंगे ,डॉ. रुपेश गांगुर्डे, ऋषीकेश जोशी, निकिता होळकर, तृप्ती मुंदडा यांनी सहभाग घेतला.