नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात सचिन अंधुरेच्या अटकेने तपासाला गती मिळण्याची शक्यता

0
879
Google search engine
Google search engine

 

नितीन ढाकणे, दिपक गित्ते:

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभाग सीबीआयने शनिवारी औरंगाबाद येथून एका संशयिताला अटक केली आहे. सचिन प्रकाशराव अंधुरे असे या संशयित आरोपीचे नाव आहे. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्यांपैकी सचिन अंधुरे एक असल्याचे सांगण्यात येत आहे. सीबीआय या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा मागच्या पाचवर्षांपासून तपास सुरु आहे. सचिन अंधुरेच्या अटकेने या संपूर्ण कटाचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २० ऑगस्ट २०१३ रोजी नरेंद्र दाभोलकर पुण्यात असताना मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी सकाळी आठ चे साडे आठ दरम्यान त्यांची गोळया झाडून हत्या करण्यात आली होती. दोन अज्ञात बंदुकधाऱ्यांनी अत्यंत जवळून त्यांच्यावर चार गोळया झाडल्या होत्या. रक्ताच्या थारोळयात कोसळलेल्या दाभोलकरांचा जागीच मृत्यू झाला होता.

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि डॉ. गोविंद पानसरे या दोन्ही हत्या प्रकरणात तपासाच्या प्रगतीबद्दल मुंबई उच्च न्यायलयाने नाराजी व्यक्त करुन सीबीआय आणि विशेष तपास पथकाची (एसआयटी) कानउघडणी केल्यानंतर दोन आठवडयांनी ही अटकेची कारवाई झाली आहे.