परळी संभाजीनगर पोलिसांची डॅशिंग कारवाई

383

परळी पोलीसांनी गाडी चोरांच्या आवळल्या मुसक्या

बीड परळी वैजनाथ: नितीन ढाकणे

बीड जिल्हायात मोटार सायकलचा चोरांनी गाडी चोरीचा धुमाकूळ घातला होता परंतु बीड जिल्हायातील अंबाजोगाई, गेवराई ,बीड,केज ,माजलगांव,वडवणी,
धारूर नेकणूर,परळी,चौसाळा,आष्टी ,पाटोदा या तालूक्यात मोटार सायकली चोरी करणारे दोन संशयीत आरोपींना पकडण्यात परळी संभाजी नगर पोलीस स्टेशनच्या नविन पोलिसांना यश आले आहे .असे पो.नि.श्री उमाकांत कस्तूरे यांनी सांगितले .
परळी येथील संभाजी नगर पोलिसांनी दोन संशयीत आरोपींची विचारपूस केली परंतु आरोपीने उडवा-उडवी चे उत्तर दिले परंतु संभाजी नगर पोलीसांना संशय आला व त्यांनी पोलीसी खाकी दाखवताच त्यांनी दहा गाड्या चोरून नेल्याचे सांगितले . बीड जिल्हातील वेगवेगळ्या तालुक्यातील अनेक प्रकारच्या काही मोटार सायकली चोरल्या असून त्या पल्सर,होंडा,शाईन , पँशन काळी, लाल सदर दहा मोटरसायकल संभाजी नगर पोलीसांनी ताब्यात घेतल्या आहेत व त्यांच्या कडून अनेक चोरीच्या गाड्या मिळून येतील अशी चर्चा होत आहे सदर तपास परळीच्या संभाजी नगर पोलिस स्टेशनचे पो.जमादार भताने पुढील तपास करत आहेत.
सदरील कामगिरी बीडचे पोलिस अधिक्षक श्री जी. श्रीधर साहेब,अजित बोराडे (अप्पर पोलिस अधिक्षक) अंबाजोगाई ,गायकवाड साहेब (उपविभागीय पोलिस अधिकारी) अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली परळी संभाजी नगर पोलिस स्टेशनचे पो.नि.उमाकांत कस्तूरे , पो.कॉ सचीन सानप, पो .जमादार व्यंकट भताने,पो.कॉ रुपेश शिंदे, पो.कॉ.अर्जुन मस्के,पो ना .सुनिल घोळवे ,पो ना.पुरूषोत्तम बडे, यांनी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे