अकोला ब्रेकिंग :- भारिप नेते आसिफ खान यांचा खून करून मृतदेह पूर्णा नदीत फेकला -आरोपी अटकेत

0
3531
Google search engine
Google search engine

१५ दिवसातील अकोल्यातील दुसरा खून

अकोला- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर येथे हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचा मृतदेह म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या पुलावर आणून पूरामध्ये फेकून देण्यात आला.