निफाड तालुक्यातील चांदोरी राजवाडा येथील ईशा सुरेश पगारे या मुलींचे अपहरण

0
795
Google search engine
Google search engine

नाशिक (प्रतिनिधी)

निफाड तालुक्यातील चांदोरी राजवाडा येथील सुरेश रामचंद्र पगारे वय 41 वर्ष धंदा मंजुरी राहणार चांदोरी राजवाडा ता. निफाड जि.नाशिक यांनी फिर्याद दिली की त्यांची मुलगी नाव ईशा सुरेश पगारे वय 17 वर्षे दि.23/5/2018 रोजी सकाळी साडे अकरा वाजता एम एस सी आय टी चे ॲडमिशन घेण्यासाठी चांदोरी बाजार तळ येथे कॅम्पुटर क्लासमध्ये जाते असे सांगून निघून गेली तीस कुणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेले बाबतची फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल असून तिचे वर्णन नाव कु.ईशा सुरेश पगारे वय 17 वर्षे धंदा शिक्षण रा.चांदोरी राजवाडा ता.निफाड जि.नाशिक वर्णन शरीराने मजबूत रंग गोरी उंची चार फूट पाच इंच चेहरा उभट डोळे काळे नाक सरळ शिक्षण बारावी नसणीस अंगात काळे रंगाचा पंजाबी ड्रेस खाली बॉर्डर असलेला पायात काळे रंगाची सेंडल व पायात तोरड्या काळे रंगाची दप्तर मराठी व हिंदी भाषा बोलते.
पुढील तपास सायखेडा पोलीस स्टेशन करत सुरू आहे.