अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीची आठवण म्हणुन लावले वटवृक्षाचे झाड – घुईखेड येथे भाजपातर्फे अनोखी श्रध्दांजली

0
724
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
तालुक्यातील घुईखेड येथे भाजपाच्या वतीने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीची आठवण म्हणुन वटवृक्षाचे झाड लावुन अनोखी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
घुईखेड येथील श्रीमती कमलाबाई टावरी सभागृहात भानुदास बनकर यांच्या अध्यक्षतेखाली श्रध्दांजली सभा संपन्न झाली. तर प्रमुख पाहुणे म्हणुन भाजपाचे चांदूर रेल्वे तालुकाध्यक्ष पप्पु उर्फ आशुतोष गुल्हाणे, अनिल वानखडे , संजय गिरुळकर, शंकरराव भोयर, डॉ . हेमंत जाधव, सचिन मेहर आदींची उपस्थिती होती. सर्वप्रथम एक वटवृक्षाचे झाड यावेळी लावण्यात आले. यानंतर अटलजींना सामुहीक श्रध्दांजली वाहण्यात आली. शांती पाठाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी मधूकर हरडे, दिपक जयस्वाल, अशोक नवघरे, सुरेश नवघरे, लहाणु मेश्राम, सतिष पनपालीया, नंदू काकडे, धिरज नेवारे, अरूणराव जाधव, तुळशिदास वैद्य, गजानन दानी, शेख ताजमोहम्मद, रवि उदयकर, राजू पाचखेडे, अरून यावले, दिलीप नागपुरे, सुधाकर हरडे, राजू ड्रायवर यांसह भाजपा कार्यकर्ते,  गावकरी प्रामुख्याने उपस्थीत होते.