“झुंबा” ठरतंय व्यायामाचं तुफान :- श्री संदीप बाजड़ >< फिट फॉंर लाईफ ग्रुप सदस्यांनी केला सपत्नीक गौरव.

0
859
Google search engine
Google search engine

अमरावती : “झुंबा” हा शब्द गेलाच असेल तुमच्या कानावरून? झुंबा ट्रेनर हे नव्यानंच उदयाला आलेलं आणि पूर्वी अस्तित्वातच नसलेलं एक करिअर. आपण कुठल्याही भागात राहत असला तरी चालेल, मात्र जिल्हा क्रीडा संकुल अमरावती येथे सकाळच्या दरम्यान चक्कर झाला असल्यास एकदा तरी जाऊन पहाच की झुंबा करता कसं? हेल्थ क्लबच्या रूमला दस्तक दिल्यास एकदम डिस्कमध्ये गेल्यासारखं भन्नाट म्युझिक कानावर पडेल. फिट फॉर लाईफचा आनंद घेतांनी लोकं तुफान नाचतांना दिसतील, आणि आपलाच आपल्यावर विश्‍वास बसणार नाही की हे व्यायाम करताहेत? पण ते खरंय, कारण मला हा प्रकार प्रत्यक्ष पाहायला मिळाला, कारण सध्या झुंबा हा नृत्यप्रकार नाही तर व्यायामाचं तुफान जगभरात पसरत असल्याचे प्रतिपादन संदीप बाजड यांनी १५ ऑगस्ट स्वातंत्रदिनी आयोजित फिट फॉर लाईफ कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून सत्काराप्रसंगी बोलतांना व्यक्त केले.

गोवा – महाराष्ट्र अंतर्गत शासन मान्यता प्राप्त कला, पर्यटन, सांस्कृतिक, साहित्य, सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानले जाणारे साहित्य मानवसेवा परिषद २०१८ या वर्षासाठीचे स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय मानवसेवा पुरस्कार द. पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशनचे संस्थापक सदस्य संदीप बाजड या पत्रकार साहित्यिकाने प्राप्त केला आहे. अमरावती जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी गौरवास्पद असून आमच्या सहकाऱ्याचा सन्मानपुर्वक सत्कार करणे हे आमचे कर्तव्य आहे, फिट फॉर लाईफ क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी स्वातंत्रदिनी ध्वजारोहणाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात केली, यावेळी फिट फॉर लाईफ क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत संदीप बाजड व सपत्नीक अनिता बाजड यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन व्यासपीठावर गौरविण्यात आले. यादरम्यान प्रत्येकांनी आपल्या जीवन शैलीवर प्रकाश टाकीत देशासाठी काही तरी करण्यासोबतच फिट फॉर लाईफ क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी बलिदान देण्याचे सामर्थ्य दाखविले, हे विशेष.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती पोलीस स्पोर्टचे प्रशिक्षक धिरज जोग तसेच सत्कारमूर्ती संदीप बाजड व अनिता बाजड हे प्रामुख्याने उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून व्हीसिएन न्यूज वृत्तवाहिनीचे संपादक अमोल नानोटकर, लता उईके, काजल जोग, अशोक भूसुम, निकिता तिरथकर, नरेश तिरथकर, गीतांजली भालेराव, आशुतोष जिचकार, ज्योती नानोटकर, उमेश जयस्वाल, जाकीर शेख (घोडेवाले), अज्जू चौधरी, मुन्ना ठाकूर, योगिता ठाकूर, अनुज गोरडे, लखन ठाकूर, मोनाली वसू, मीनल पावडे, संजय चंदेले यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश जयस्वाल तर आभार प्रदर्शन म्हणून लता उईके यांनी केले.

*जीवन जगण्यासाठी, चला जगनं शिकूया. – धीरज जोग*

फिट फॉर लाईफ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून अमरावती पोलीस स्पोर्टचे प्रशिक्षक धिरज जोग बोलतांना म्हणाले कि, विविध विचार, स्वभाव आणि इतर बरीच कारणं आपल्या चिंतेचं मूळ असतात. कालांतराने या चिंतेचं तणावात रुपांतर होतं. विभिन्न प्रकारच्या कारणांमुळे झालेल्या तणावाचे प्रकार आणि त्यानुसार त्या व्यक्तीच्या वागणुकीतही खूप तफावत आढळते. तणाव दूर व्हावा म्हणून वेळोवेळी घेतली जाणारी औषधं, आहारातील बदल यांचा तणाव किंवा चिंता कमी करण्यास फायदा होत नाही. म्हणूनच आपल्याला नेमका कोणत्या गोष्टींचा त्रास होतो, आपल्या चिंतेमागचं नेमकं कारण काय असावं याचा शोध त्या व्यक्तीने स्वतःच घेणं आवश्यक आहे. त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन त्यामागची सगळी कारणं शोधून तोडगा काढणं आवश्यक आहे. शारिरिक स्वास्थ्य वाढविणारी आणि आरोग्य टिकविणारी क्रिया म्हणजे व्यायाम. नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर (उतारवयातही) निरोगी ठेवण्यास मदत होते. व्यायामाने मानसिक आरोग्यही छान राहते. नियमित व्यायामामध्ये ताणण्याचे व्यायाम, एरोबिक्स व श्वासाचे व्यायाम यांचा समावेश असावा. व्यायाम केल्याने माणसाला नवीन उर्जा प्राप्त होते. व्यायाम हा कोणत्याही वयातील व्यक्ती करू शकतो. बैठे व्यायामही करता येतात, ज्यामुळे जीवन जगण्यासाठी चला जगनं शिकूया असं म्हणणे आता तरी वावगे ठरणार नाही. अशी माहिती त्यांनी व्यासपीठावरून बोलतांना दिली.