अकोट शहर येथे बकरी ईद व कावडयात्रा निमित्त शांतता समिती सभा संपन्न

718

आकोटः(संतोष विणके)- शेवटच्या श्रावण सोमवारी अकोट शहरात कावड मिरवणुक निघत असुन जवळपास २४ च्या आसपास कावड मंडळं या मिरवणुकीत सहभाग घेत असतात. तसेच आगामी ईद आणि शिवकावड यात्रा निमित्ताने अकोट शहरात शांतता व सुव्यवस्था राहवी व बंदोबस्ताचे नियोजन चांगल्या प्रकारे व्हावे, व अडीअडचणी बाबत चर्चा होऊन त्यावर उपाय योजना करण्या साठी आज दिनांक 21।8।18 रोजी संध्याकाळी अकोट शहर पोलिस स्टेशनच्या सावली सभागृहात शांतता समीती सदस्यांसह मुस्लीम बांधव तथा कावड मंडळ सदस्यांची बैठक घेण्यात आली.सदर बैठकी मध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे, नगराध्यक्ष हरीनारायण माकोडे, तहसीलदार विश्वनाथ घुगे, नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत रोडे, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ,न.पा.उपाध्यक्ष अब्रारभाई आदी मान्यवर उपस्थित होते, बैठकीत उपस्थित कावड चे पदाधिकारी ह्यांनी त्यांचे अडीअडचणी बाबत प्रश्न विचारले त्याला उपस्थित अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे दिली. सभेत कावड समीतीचे अध्यक्ष संजय गोरे अनंत मिसाळ,ॲड.गांधी,सुरेश अग्रवाल,आदींनी आपले विचार मांडले.,सभेला शांतता समिती सदस्य, मुस्लिम बांधव, नगर सेवक, पत्रकार बांधव, कावड उत्सव चे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

जाहिरात