परीपत्रकाची अंमलबजावणी न झाल्यामुळे विधी महाविद्यालयाचे प्रवेश रखडले

0
622

विद्यापीठाच्या प्रमुख इमारती समोर विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण सुरू

औरंगाबाद प्रतिनिधी:

 

विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी ऍग्रिगेट 50% गुणा बाबतची अट शिथील करून 40% करण्यात विद्यापीठच्या व्यवस्थापण परिषदेच्या वतीने व डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलुगुरु डॉ.बि.ए.चोपडे यांच्या स्वाक्षरीनिशी मान्यता दिलेली आहे,परंतु सदर परी पत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश दिला जात नाही कारण महाविद्यालयात विद्यापीठा मार्फत कोणतेही परिपत्रक प्राप्त झालेले नाही व तशा प्रकारच्या सूचना मिळाल्या नाही त्यामुळे सदर परिपत्रक प्रमाणे प्रवेश दिला जात नसल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रमुख इमारती समोर दि.21 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सर्व विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आमरण उपोषणास बसले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,संदर्भ क्र.अभ्यास वि./विधी /2018 /17311-17330
दिनांक 30-07-2018 विद्यापीठ प्रशासनाने सदर परिपत्रक काढले होते परंतु याची अमलबजावणी जाणून बुजून टाळण्यात येत असून आपण काढलेल्या परिपत्रक नुसार तात्काळ प्रवेश देण्यात यावा अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे. सर्व महाविद्यालयात नियमित तासिका 25 जुलै पासून सुरू असून प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थी या तासिके पासून वंचित राहत आहेत.परिणामी विद्यार्थ्यांचे या प्रकारामुळे शैक्षणिक नुकसान होत असून विद्यापीठ प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे विधी महाविद्यालयाच्या जे ऍग्रिगेटमुळे विद्यार्थी वंचित आहेत त्यांना प्रवेश देण्यासाठी सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्य यांना लेखी स्वरूपात सन्माननीय कुलगुरू साहेबांनी पर्यंत प्रवेश देण्यात यावा अशी मागणी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.तसेच प्रवेश मिळेपर्यंत पाणी देखील पिणार नाहीत.उपोषण दरम्यान जर विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी सन्माननीय कुलगुरू साहेब व मा.साधना पांडे मॅडम यांच्यावर राहील.अशी मागणी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आहे.