👉🏻तालुक्यात 218 पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदानाचे वाटप,प्रत्येक कुटूंबाला पाच हजार रुपयांची मदत

0
1087
Google search engine
Google search engine

👉🏻तालुक्यात 218 पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदानाचे वाटप,प्रत्येक कुटूंबाला पाच हजार रुपयांची मदत.
👉🏻अनुदानाचे 10 लाख 90 हजार थेट बँक खात्यात जमा

चांदुर बाजार:-

चांदुर बाजार तालुक्यात 17 ऑगस्ट ला अतिवृष्टी झाली होती यात 231 घराची पुरामुळे पडसद झाली होती.त्यामुळे 218 कुटूंब उघडयावर आले होते.बेघर झालेल्या या सर्व कुटूंबाना शासन कडून सानुग्रह अनुदान चे वाटप 21 ऑगस्ट ला करण्यात आले.हे शासकीय अनुदान स्थानिक तहसिल कार्यलाय मार्फत देण्यात आले आहे.घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे अन्नधान्य खराब झालेल्या कुटूंबाना उदरनिर्वाह साठी सानुग्रह अनुदान तात्पुरती मदत म्हणून शासन कडून देण्यात येते.तालुक्यातील शिरजगाव कसबा व करजगाव महसूल मंडळातील 10 पूरग्रस्त गावामधील 218 कुटूंबाना देण्यात आले आहे.या सर्व पूरग्रस्त कुटूंबासाठी एकूण 10 लाख 90 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला.हा निधी पूरग्रस्त कुटूंब प्रमुखांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.
गाव निहाय पूरग्रस्त कुटूंबाना अनुदान मिळाल्याची संख्या सुभानपूर -६,बोदड-12,गोविंदपूर-1,कुऱ्हा-१३,करजगाव -14,सर्फपूर- १,करहोडी-2,देऊरवाडा-28,शिरजगाव कसबा -७६,कारंजा -६५ या प्रमाणे आहे.ही सानुग्रह मदत एक कुटूंबाला पाच हजार रुपये याप्रमाणे देण्यात आली.असल्याची माहिती तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिली.


“”पूरग्रस्त भागातील नुकसान झालेल्या ना लवकरात लवकर मदत मिळावी या साठी आमदार बच्चू कडू यांनी दिनांक 20 ऑगस्ट ला अमरावती जिल्हाधिकारी कार्यलाय मध्ये सभा घेऊन आरटीजीएस द्वारे निधी उपलब्ध करून दयावा अशा आदेश दिला होता.””

फोटो मेल केले आहे.