आ. आर. टी. देशमुख यांना आजवर आमच्या गावात विकासकामे का केली नाहीत असा जाब विचारत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुकी केली

0
819
Google search engine
Google search engine

माजलगाव :

साठे जयंतीच्या कार्यक्रमासाठी माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथे आलेले . आर. टी. देशमुख यांना आजवर आमच्या गावात विकासकामे का केली नाहीत असा जाब विचारत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुकी केली. यावेळी आमदारांचे स्वीय सहाय्यक पवार आणि गाडीच्या चालकास देखील मारहाण करण्यात आली. हि खळबळजक घटना आज दुपारी .३० वाजताच्या सुमारास घडली.

राजेवाडी येथील अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाचा कार्यक्रम आटोपून . देशमुख माघारी निघाले होते. यावेळी मागील चार वर्षात आमच्या गावात एकही विकासकाम तसेच बंधाऱ्याचे काम का केले नाही असा जाब विचारत राष्ट्रवादीच्या उपसरपंच यांचे पती रामेश्वर थेटे, भाऊसाहेब पवार, ईश्वर थेटे, दीपक महागोविंद, सुखदेव कुरे, माऊली महागोविंद यांच्यासह जवळपास २५ कार्यकर्त्यांनी आमदार देशमुख यांना घेराव घातला. यावेळी शाब्दिक वाद वाढत जाऊन आमदारांना धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी आमदारांना सोडवण्याचा प्रयत्न करणारे त्यांचे स्वीय सहाय्यक पवार आणि गाडीच्या चालकास देखील बेदम मारहाण करण्यात आली. याची माहिती मिळताच साठे जयंती उत्सव समितीच्या आयोजकांनी तात्काळ धावत जाऊन आमदारांभोवती सुरक्षा कडे करून त्यांना बाजूला काढले. घातेंची माहिती मिळताच राजेवाडीत पोलिसांनी मोठ्या फौजफाटासह धाव घेतली. पोलीस बंदोबस्तात आमदारांना राजेवाडीतून सुरक्षित रवाना करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणामुळे राजेवाडीत बराच वेळ तणावाचे वातावरण होते.