कडेगांव मधील पै.अमोल डांगे

Google search engine
Google search engine

सांगली: – सांगली जिल्ह्यातील कडेगांव येथील पै.अमोल राजाराम डांगे अतिशय जिद्दीने व खडतर परिस्थितीतून मात करीत एक यशस्वी मल्ल-पहिलवान म्हणुन कडेगांव तालुक्यात परीचित असलेले अमोल डांगे यांचे विषयी भारतीय पत्रकार संगठन न्युज नेटवर्क चॅनलच्या माध्यमातुन घेतलेला थोडक्यात आढावा.कुस्ती क्षेत्रात देशात,महाराष्ट्रात आपले नाव व्हावे या एकमेव ध्यासाने लहानपणापासून म्हणजे १९९६-९७ पासुन कडेगांव मध्ये फक्त एकच लहान मारूती तालीम होती.या तालमीत कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरवात केली.त्यानंतर शहरातच आपण कुस्ती केंद्र बघीतले पाहीजे म्हणुन प्रथम इस्लामपुर तालीम,न्यु मोतीबाग तालीम नंतर धुमछडी आखाडा दिल्ली इत्यादी ठीकाणी अर्जुन पुरस्कार विजेते पै.गणपतराव आळंदकर, महाराष्ट्र डबल केसरी पुरस्कार मिळवलेले पै.चंद्रहार पाटील,पठारी केसरी पुरस्कार प्राप्त पै.विनोद गोरे,राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता पै.रामचंद्र सारंग इत्यादी मान्यवर पहिलवानांचे अमुल्य असे मार्गदर्शन लाभले आणि याच अनुभवाच्या जोरावर भारती विद्यापीठ कुस्ती स्पर्धा सलग तीन वर्षे विजेता झालो.नंतर महाराष्ट्र महावीर केसरी कास्य पदक,बारामती कुस्तीगार संघ विजेता,कवलापुर कुस्ती स्पर्धा विजेता, मुंबई महापौर केसरी स्पर्धा विजेता,क्रिडा व युवक सेवासंचनालय महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धा विजेता इत्यादी ठिकाणी विजेतेपद पटकावले नंतर चंदगड येथे आॅल इंडीया कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला आणि त्यानंतर ठाणे येथे झालेल्या ठाणे महापौर केसरी स्पर्धेत विजेतेपद पटकावले अशी एकापाठोपाठ एक असे विजेतेपद पटकावणारे कडेगांव तालुक्यातील बहुतेक पै.अमोल डांगे हे एकमेव पहिलवान असतील.कडेगावच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला अशा या पै अमोल डांगे यांना सांगली जिल्हा इंचार्ज या नात्याने विदर्भ24न्युज नेटवर्क चॅनलच्या वतिने पुढील वाटचालीस शुभेच्छा!!