पत्रकार अर्जुन खिरोडकार यांची हिवरखेड लोकजागर मंच प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती

0
703

अकोला(संतोष विणके) – पञकार अर्जुन खिरोडकार यांची नुकतीच हिवरखेड लोकजागर मंच प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चंडिका चौक येथील लोकजागर मंचच्या कार्यालयात दि. १९अॉगस्ट२०१८ रोजी संध्याकाळी ही घोषणा करण्यात आली.ही घोषणा लोकजागर मंच हिवरखेड अध्यक्ष श्री महेंद्र कराळे ,संतोष गावडे,अंकेश भाबुरकर,पंकज इंगळे,अंकेश ताथोड जावेद पठाण,व इतर सदस्य यांचा उपस्थितीत करण्यात आली,यावेळी प्रसिद्धी प्रमुख पदी अर्जुन खिरोडकार यांची निवड करून ,त्यांना लोकजागर मंच द्वारा पुस्तक देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले,लोकजागर गेल्या कित्येक दिवसा पासून हिवरखेड परीसरात विविध कार्य करून गोरगरिबांनच्या मदतीला धावत आहे,लोकजागरचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी पदाधीकारी हे हिवरखेड येथे आपुलकीच्या भावनेने शालेय विद्यार्थ्यांना सहकार्य करीत आहे.खिरोडकार यांच्या निवडीने त्यांच्या मित्र परीवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन होत आहे.