अंबाजोगाई दर्शन न्युज चॅनलच्या वतीने राज्यस्तरीय समुह भजन व समुह नृत्य स्पर्धेचे 1 व 2 सप्टेंबर रोजी आयोजन

0
1661
Google search engine
Google search engine

 

-संयोजक सतिष मोरे नागेश औताडे यांची माहिती-

बीड: अंबाजोगाई :

नितीन ढाकणे , अमोल मुंडे

मनोहर अंबानगरी ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणुन ओळखली जाते. त्यामुळे या सांस्कृतीक नगरीमध्ये युवा व ज्येष्ठ कलावंतांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी येथील अंबाजोगाई दर्शन न्युज चॅनलच्या वतीने राज्यस्तरीय भव्य सांप्रदायीक समुह भजन व समुह नृत्य स्पर्धेचे (दोन गटात) आयोजन दि.1 व 2 सप्टेंबर रोजी अंबाजोगाई शहरात करण्यात आले आहे.तरी इच्छुक स्पर्धकांनी व स्पर्धक संघांनी नांव नोंदणीसाठी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन संयोजक सतिष मोरे व नागेश औताडे यांनी केले आहे.

अंबाजोगाई दर्शन न्युज चॅनलच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, युवा व ज्येष्ठ कलावंतांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी राज्यस्तरीय भव्य समुह भजन व समुह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.समुह भजन स्पर्धेसाठीचे नियम व अटी पुढील प्रमाणे स्पर्धक संघामध्ये किमान सात सदस्य असणे अनिवार्य आहे. (साथीदार सोडून) सादरीकरण करण्यासाठी प्रत्येक संघाला केवळ 15 मिनीटे वेळ देण्यात येईल.स्पर्धक संघाने 15 मिनीटामध्ये अभंग, भारूड,प्रबोधनपर गवळण आदी प्रकार सादर करावेत स्पर्धक संघाने साथीदार व वाद्य स्वतःसोबत आणावे स्पर्धेमध्ये स्वर,ताल, अभंग,निवड या सोबतच वेषभुषेसाठी ही मुल्यांकन ग्राह्य धरण्यात येईल.या स्पर्धेत पुरूष, महिला व विद्यार्थी यांना सहभागी होता येईल. समुह भजन स्पर्धेसाठी प्रथम पाच हजार रूपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपञ, द्वितीय तीन हजार रूपये,स्मृतिचिन्ह व प्रमाणपञ तर तृतीय दोन हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपञ हे पारितोषिक राहिल. तसेच समुह नृत्य स्पर्धा ही दोन गटांत होईल.1) बालगट-इयत्ता पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थी व खुला गट अशा दोन गटांत समुह नृत्य स्पर्धा होईल.स्पर्धेसाठी प्रत्येक संघामध्ये किमान सात स्पर्धक असणे अनिवार्य आहे.संयोजकाच्या वतीने गीतांची निवड बंधनकारक नाही.नांव नोंदणी करते वेळी स्पर्धकांनी गीताची सिडी किंवा पेनड्राईव्ह संयोजकाकडे देणे आवश्यक आहे. सादरीकरणावेळी ज्वालाग्राह्य पदार्थांचा वापर करता येणार नाही. स्पर्धा खुल्या गटात होणार असल्यामुळे वयोमर्यादेचे बंधन नाही. समुह नृत्य स्पर्धेतील खुल्या गटातील प्रथम विजेत्यास पाच हजार रूपये रोख,स्मृतिचिन्ह व प्रमाणपञ व द्वितीय विजेत्यास तीन हजार रूपये रोख स्मृतिचिन्ह व प्रमाणपञ  तसेच तृतीय विजेत्यास दोन हजार रूपये रोख स्मृतिचिन्ह व प्रमाणपञ हे पारितोषिक देण्यात येईल.तसेच समुह नृत्य स्पर्धेतील बाल गटातील प्रथम विजेत्यास तीन हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपञ व द्वितीय विजेत्यास दोन हजार रूपये रोख स्मृतिचिन्ह व प्रमाणपञ  तसेच तृतीय विजेत्यास एक हजार रूपये रोख स्मृतिचिन्ह व प्रमाणपञ हे पारितोषिक देण्यात येईल.दोन्ही स्पर्धेसाठी स्पर्धक संघाने शुक्रवार,दि.31 ऑगस्ट 2018 पर्यंत संयोजकांच्या पुढील क्रमांकावर नोंदणी करणे आवश्यक आहे. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहिल.स्पर्धेच्या नियम व अटी मध्ये ऐनवेळी बदल करण्याचा अधिकार संयोजकांकडे राखीव असेल स्पर्धेचे ठिकाण आद्यकवि मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह नगरपरिषद अंबाजोगाई हे असून शनिवार,दि.1 सप्टेंबर व रविवार,दि. 2 सप्टेंबर रोजी अनुक्रमे या स्पर्धा होतील.प्रत्येक संघाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.स्पर्धेचे प्रवेश शुल्क पाचशे रूपये इतके आहे. इच्छुक स्पर्धकांनी व संघानी अंबाजोगाई दर्शन न्यु चॅनलचे संपादक सतिष मोरे (मो – 9552609188 व 9422244170) तसेच सहसंपादक नागेश औताडे (मो-9850735620 व 7020633523) या क्रमांकावर तसेच संपर्क कार्यालय,अंबाजोगाई दर्शन न्युज चॅनल,नगर परीषद ऑफिस कॉम्प्लेक्स,शॉप नं-47, अंबाजोगाई (जि.बीड) या पत्त्यावर 31 ऑगस्ट 2018 पूर्वी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन संयोजक, महाराष्ट्र राज्यस्तरीय समुह भजन व समुह नृत्य स्पर्धा यांच्या वतीने करण्यात येत आहे.