मी कॉग्रेस पक्षाचा सभापती:-प्रमोद घुलक्षे नवनिर्वाचित सभापती

0
1112
Google search engine
Google search engine

👉🏻मी कॉग्रेस पक्षाचा सभापती,राष्ट्रवादी चा नव्हे:-प्रमोद घुलक्षे नवनिर्वाचित सभापती बाजार समिती

👉🏻सोशल मीडियावर ठरत होता मोठा चर्चेचा विषय,पत्रकार परिषद मध्ये सभापती यांनी दिला खुलासा.

चांदुर बाजार:-बादल डकरे
23 ऑगस्ट ला कृषी उत्पन्न बाजार सभापती पदी अविरोध निवड झाली.मी अमरावती जिल्हा कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सभापती या पदावर विराजमान झालो आहे.परंतु काही राजकीय मंडळी माझ्या सभापती पदाचा वापर करून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधू पाहत आहे.अशी माहिती चांदुर बाजार येथील बाजार समिती चे नवनिर्वाचित सभापती प्रमोद घुलक्षे यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली.सभापती यांच्या निवडणूक नंतर वृत्तपत्र च्या शुभेच्छा जाहिरात वरुण नेमका सभापती कोणत्या पक्षचा हा चांदुर बाजार तालुक्यातील राजकिय वातावरणात चर्चाच विषय ठरला होता.
तर या सर्व प्रकरणावर आपली बाजू स्पस्ट करण्यासाठी सभापती प्रमोद घुलक्षे यांनी बाजार समिती च्या सभागृहात या पत्रकार परिषद आयोजित केली होती.मात्र या पत्रकार परिषद ला सत्ता धारी संचालक अनुउपस्थिती होते.त्यामुळे ही पत्रकार परिषद तातडीने आणि वेळेवर निश्चित केली असल्याची माहिती ही नवनिर्वाचित सभापती यांनी दिली.
या वेळी या पत्रकार परिषद ला बाजार समिती सचिव मनीष भारंबे,माजी सभापती रावसाहेब लंगोट,माजी सभापती बाबुराव जवजाळ,हरिभाऊ बोडे, दिलीप धोंडे,विलास शेकार ,अमोल लगोटे, खरेदी विक्री अध्यक्ष शिवाजी बंड कॉग्रेस पक्ष अध्यक तालुका किशोर देशमुख उपस्थित होते.

तर पत्रकार यांच्या उपस्थितीत मी माझ्या सभापती पदाचा पदभार स्वीकारत असल्याचे घुलक्षे यांनी सांगितले.