ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांची पुन्हा क्षमायाचना !

0
1496

डबलिन (आयर्लण्ड) – ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी येथे पुन्हा एकदा पाद्य्रांनी केलेल्या लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी क्षमायाचना करून दुःख व्यक्त केले आहे. यापूर्वी त्यांनी अमेरिकेतील चर्चमधील पाद्य्रांनी केलेल्या बालकांच्या लैंगिक शोषणावरून संपूर्ण कॅथलिक समाजाची पत्र लिहून क्षमा मागितली होती. सध्या ते युरोपमधील आयर्लण्डच्या दौर्‍यावर आहेत.

१. येथे सरकार आणि अधिकारी यांना मार्गदर्शन करतांना पोप फ्रान्सिस म्हणाले की, लहान मुलांचे लैंगिक शोषण करणार्‍या पाद्य्रांना शिक्षा करण्यात चर्चचे अधिकारी अपयशी ठरले आणि त्यांच्या या कृत्यांना लपवण्यात आले. ‘हे कॅथलिक समाजासाठी दुःखदायक आणि लज्जास्पद आहे’, याची मला जाणीव आहे. आम्ही चर्चला या अपराधांमधून बाहेर काढण्यासाठी कटीबद्ध आहोत.

२. जगभरात पाद्य्रांकडून करण्यात येणार्‍या मुलांच्या लैंगिक शोषणांच्या घटनांत आयर्लण्डही वरच्या स्थानावर आहे. गेल्या एक दशकापासून येथील सरकारच्या चौकशीमधून अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. पाद्य्रांकडून सहस्रावधी मुलांवर बलात्कार आणि त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच चर्चकडून चालवण्यात येणार्‍या शाळांमधील मुलांवरही शारीरिक अत्याचार करण्याच्या घटना समोर आल्या. येथील बिशपकडून या घटनांवर पांघरूण घालण्यात आल्याचेही समोर आले.

३. या वेळी आयर्लण्डचे पंतप्रधान लियो वराडकर म्हणाले की, देशात चर्चमधील पाद्य्रांकडून सातत्याने झालेल्या बालकांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांमुळे दुःखाचे वातावरण आहे. पीडितांना न्याय आणि मानसिक समाधान मिळण्यासाठी बरेच काही करावे लागणार आहे.