बकरी ईद च्या दिवशी मुस्लीम तरुणाच्या जिवंत अवयवाची कुर्बानी

0
1983
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे लिपिक इन्नुस शेख यांचे अवयवदान

हुकमत मुलाणी- उस्मानाबाद –

उस्मानाबाद येथील जिल्हा परिषद येथील शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यक इन्नुस सत्तार शेख यांचा ब्रेन डेड झाल्यामुळे यांच्या कुटूंबियांनी मुस्लिम बांधवांच्या पवित्र कुर्बानी या सणादिवशीच आवयवदान करण्याचा मोठा धाडशी निर्णय घेतल्याने महाराष्ट्रात या शेख कुटूंबीयानी वेगळाच आदर्श समाजासमोर ठेवला आहे उस्मानाबाद जिल्हा परिषदेतील हे अवयवदान हे पहिलेच आहे

विशेष म्हणजे कुर्बानी सणादिवशीच जिवंत अवयवाची कुर्बानी देऊन चौघांना जिवदान दिले आहे
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील एका गरीब कुटूंबातील सत्तार शेख यांना इन्नुस हा एकच मुलगा होता इन्नुसच्या लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले होते त्यामुळे लहान वयात इन्नुसने कुटूंबाच्या संसाराचे न सहन होणारे ओझे खांद्यावर घेऊन निराधाराचा न पेलणारा डोंगर चढून शिक्षण घेतले कुटूंबाची अत्यंत हालाखीची परस्थीती होती सन १९९८ ते सन २०१२ पर्यत इन्नुस शेख यांनी सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व होर्टी येथील आयुर्वेदीक दवाखान्यात शिपाई पदावर नौकरी केली नंतर त्यांची बढती होऊन कनीष्ठ सहाय्क लिपीक या पदावर उस्मानाबाद येथील जिल्हा परिषद विभागात कार्यरत होते ता १९ (आँगष्ट ) रोजी इन्नुस शेख हे मोटार सायकलवर सोलापूर तुळजापूर रोडवर नळदुर्ग कडे जात आसताना सिंदफळ शिवारात आपघात झाला होता त्या आपघातात ते गंभीर जखमी झाले होते त्यांना तुळजापूर येथील पत्रकारांनी ओळखून खाजगी गाडीत त्यांना तुळजापूर येथे उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल केले होते त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे ते बेशुद्ध अवस्थेत होते त्यांना पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले परंतू तेथूनही सोलापूर येथील काशेगावकर हाँस्पीलमध्ये दाखल करण्यात आले इन्नुस शेख म्रत्युशी झुंज देत होते मंगळवारी रात्री त्यांची तेथील डाँक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा मेंदू म्रत झाला आसल्याची घोषणा केली त्या नंतर शेख कुटूंबीयांचा आधार तुटल्याने त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला होता परंतू त्यांच्या आई ,पत्नी व मुलांचे डाँक्टरांनी समपुदेशन केल्यामुळे त्यांचे आवदान करण्याचा निर्णय कुटूंबीयांनी घेऊन इन्नुसची एक किडनी ,स्वादुपिंड ,डोळे ,या अवयवास दान करण्यास कुटूंबीयांनी मान्यता दिली हे अवयव एक किडनी व स्वादुपिंड पुण्याच्या सह्याद्री हाँस्पीलमध्ये रवाना करण्यात आले लिव्हर ससुन रुग्णालयात तर शासकिय रुग्णालय सोलापूर येथे दोन डोळे तर एक किडनी सोलापूरच्याच आश्वीनी रुग्णालयातील रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आले हि प्रक्रीया करतेवेळी ग्रीन काँरिडाँर राबवीण्यात आली होती या सध्याच्या काळात उस्मानाबाद जिल्ह्यात अवयवदान करण्यासाठी समाजीक व शासकिय विभागातून प्रतिसाद मिळत आहे यात गेल्या महिन्यात पोलीस हवलदार चव्हाण यांनी त्यांच्या पत्नीचे ही अवयवदान केले होते तर आज उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेतील लिपिक इन्नुस शेख यांच्या कुटूंबीयांनी अवयवांनी पवित्र सणादिवशीच मोठी कुर्बानी देऊन हा समाजापूढे वेगळाच आदर्श ठेवला आहे त्यांनी जिवंत इन्नुसचे शरीर दान करण्यासाठी काळजाळवर मोठा दगड ठेऊन मोठा निर्णय घेतला आहे आज २३ आँगष्ट येथील मुस्लिम कबरस्तान येथे त्यांचा दफनविधी करण्यात आला दरम्यान त्यांच्या सहकारी मित्रांनाही दुख अनावर झाले होते त्यांनीही दफविधी दरम्यान हंबरडा फोडला आमचा मित्र जिवंत आहे आमच्या यावर विश्वास बसत नसल्याचे सहकारी मित्राकडून एकायला मिळाले उस्मानाबाद जिल्हा परिषद विभागात हे पहिले अवयवदान करण्यात आले आहे इन्नुस शेख यांच्या पश्चात आई,पत्नी व तीन मुले असा परिवार आहे इन्नुस कुटूंबातील कर्ता आसल्यामुळे या दुखद घटनेमुळे मुलांचे शिक्षण सुरु आहे त्यामुळे या कुटूंबाला आधार देण्यासाठी सामाजीक संघटनांनी जर मदतीचा हातभार लावला तर मोठे कार्यच म्हणावे लागेल असे मत शेख यांच्या मित्रपरिवारातून व्यक्त केले जात आहे