शिधापत्रिकेवर आमदार बच्चू कडू यांच्या नावाचे शिक्के; बेकायदेशीर शिक्के मारणाऱ्यनवर कार्यवाही करा;

0
3563

शिधापत्रिकेवर आमदार बच्चू कडू यांच्या नावाचे शिक्के;
बेकायदेशीर शिक्के मारणाऱ्यनवर कार्यवाही करा;नगरसेवक तिरमारे ची मागणी ;
पुरवठा मंत्री गिरीश बापट कडे तक्रार

चांदूर बाजार—प्रतिनिधी

स्थानिक तहसील कार्यालयामार्फत आमदाराची राहुटी आपल्या गावात 2018 या अभियानांतर्गत शिबिरांमधून अठराशे शिधापत्रिकेवर आमदार बचू कडू यांच्या नावाचे शिक्के मारून शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या होत्या. सदर शिधापत्रिकेवर बेकायदेशीर शिक्के मारणार्यावर कार्यवाही करावी अशी मागणी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली आहे.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ व माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने ”आमदाराची राहुटी आपल्या गावात 2018” या अभियानांतर्गत 1 जानेवारी 2018 ते 6 फेब्रुवारी 2018 गावागावात कॅम्प आयोजित केले होते . या राहोटी कार्यक्रमामध्ये शिधा पत्रिके पासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या दृष्टीने त्यांचे दस्तऐवज गोळा करण्यात आले होते. या दस्ताऐवजांची शहानिशा केल्यानंतर अंदाजे 1800 लाभार्थ्यांना शिधापत्रिका देण्यात आल्या होत्या. मात्र या शिधापत्रिकेवर “आमदार बच्चू कडू आमदाराची राहुटी आपल्या गावात 2018 ” असे शिक्के मारण्यात आले असल्याचा आरोप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी केला आहे .
याबाबत नगरसेवक तिरमारे यांनी 15 जून व 7 जुलै रोजी स्थानिक तहसीलदार शिल्पा बोबडे यांना पत्राद्वारे शिधापत्रिकेवर आमदार बच्चू कडू यांचे नावाचे शिक्के कोणत्या अधिकाऱ्यांच्या आदेशाने व कोणत्या शासन निर्णयाने मारण्यात आले याबाबत चौकशीची मागणी केली होती. यावर तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी सदर शिधापत्रिकेवर मारण्यात आलेले शिक्के कोणत्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मारन्यात आले नसल्याचा दुजोरा दिला. तसेच या शिधापत्रिकेचे कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर निरीक्षण अधिकारी अचलपूर यांची स्वाक्षरी ने रेशन कार्ड लाभार्थ्यांना ते वितरित करण्यात आले असल्याचे त्यांनी आपल्या चौकशीदरम्यान सांगितले.
मात्र या राहुटी कार्यक्रमाअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या शिधापत्रिकेवर आमदार बच्चू कडू यांच्या नावाचे शिक्के मारण्यात आले असल्याचे पुरावे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या समक्ष सादर केले. व सदर शिधापत्रिकेवर शिक्का मारणारयांवर गुन्हे दाखल करण्याबाबत ची मागणी सुद्धा केली आहे. यावर पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सदर प्रकरण गंभीरतेने घेत या बेकायदेशीर बाबीवर कार्यवाहीसाठी संबंधित विभागाचे उपसचिव यांना आदेश दिले आहे.
मात्र सदर शिधापत्रिका कोणत्या एखाद्या जात, धर्म, तसेच एकाच पक्षाच्या लाभार्थ्यांना वितरित करण्यात आल्या नसल्याने यात चुकीचे काय? असा खडा सवाल लाभार्थी तर्फे उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे नगरसेवक गोपाळ तिरमारे यनिं आरोप केला आहे की, राहुटी कार्यक्रमाचा उपयोग नागरिकांच्या सोयीसाठी झाला असला तरी आमदार बच्चू कडू यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून आपला राजकीय स्वार्थ साधला आहे .असे या पत्रिकेवर स्वतःच्या नावाचा शिक्का मारून त्यांनी सिद्ध केले आहे .शिधापत्रिकेवर नियमानुसार संबंधित अधिकाऱ्यांचा शिक्का असतो .कोणत्याही खाजगी व्यक्तींचा शिका किंवा नाव त्यावर नमूद करता येत नाही. तरीही महसूल विभागाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले आहे .अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही होणे गरजेचे आहे .अशी मागणी नगरसेवक तिरमारे यांच्यातर्फे करण्यात आली आहे.
याप्रकरणी दोषींवर कार्यवाही न झाल्यास येत्या 2 ऑक्‍टोबरला आमरण उपोषण करण्याचा इशारा सुद्धा नगरसेवक तिरमारे यांनी दिला आहे . त्यामुळे पुन्हा एकदा नगरसेवक गोपाल तिरमारे व आमदार बच्चू कडू यांच्यातील राजकीय कलगीतुरा चा संवाद रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.