भगवानगडावर कोणताही मेळावा किंवा बैठक नाही

0
687
Google search engine
Google search engine

वंजारी समाजाच्या आरक्षण आंदोलनाची घोषणा करणार – फुलचंद कराड

बीड । प्रतिनिधी
दि.31 ऑगस्ट रोजी संत श्री भगवानबाबा यांची जयंती असुन याच दिवशी वंजारी समाजाच्या आरक्षण प्रश्नावर केवळ आंदोलनाची घोषणा किंबहुना आंदोलनाची सुरूवात केली जाणार आहे. भगवानगड आमचे श्रद्धास्थान असुन या दिवशी गडावर आम्ही जाणार आहोत परंतु तेथे कोणती बैठक अथवा मेळावा होणार नाही तर संत श्री भगवानबाबाचे आशिर्वाद घेवून आंदोलनाच्या प्रश्नावर आम्ही मार्गस्थ होणार आहोत अशी माहिती भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भगवानगडावर दि. 31 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय संत श्री भगवानबाबा यांच्या जयंतीचा कार्यक्रम असुन याचवेळी गडावर भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड आपल्या समर्थकांसह जाणार आहेत. भगवानगडावर आरक्षण प्रश्नावर बैठक अथवा मेळावा घेण्याचा आमचा यापुर्वीही कधीही विचार नव्हता, आणि आताही नाही. आम्ही भगवानगडाला आमचे श्रद्धास्थान मानत असुन गडाचा सन्मान राखणे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे जयंतीच्या दिवशी आम्ही गडावर जावुन भगवानबाबांचे दर्शन घेणार आहोत. याठिकाणी बाबांचे आशिर्वाद घेवुन आम्हाला आंदोलनाचे रणशिंग फुंकायचे असल्याचे फुलचंद कराड म्हणाले. वंजारी समाजास दोन टक्के आरक्षण असुन त्यावर संपुर्ण समाज नाखुश आहे. सध्या सर्वच समाज आरक्षणाची मागणी करीत असुन त्यास आमची कोणतही हरकत नाही.
वंजारी समाजाला ओबीसी मध्ये टाकावे व ओबीसीचे आरक्षण 21 टक्के करावे अशी आमची मागणी आहे. या मागणीसाठी आम्ही राज्यव्यापी आंदोलन करणार असुन दि. 16 सप्टेंबरला पुणे येथे राज्यव्यापी बैठक होणार असल्याचेही फुलचंद कराड यांनी सांगितले.