पॉवर ऑफ मिडियाची अमरावती जिल्हा कार्यकारणी घोषित…….

0
1384
Google search engine
Google search engine

पॉवर ऑफ मिडियाची अमरावती जिल्हा कार्यकारणी घोषित…….

अध्यक्षपदी उमेश लोटे तर रुपेश वाळके सचिव पदी निवड…….
——————
अमरावती : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या द पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशन महाराष्ट्र या पत्रकार संघटनेची अमरावती जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली असून अमरावती जिल्हा अध्यक्षपदी व्हीसिएन वूत्तवाहिनीचे प्रबंध संपादक उमेश लोटे यांची निवड करण्यात आली. अमरावतीचे जेष्ठ पत्रकार लोकशाही वार्ताचे विशेष प्रतिनिधी देविदास सूर्यवंशी (मामा) यांची उपाध्यक्षपदी तर सरचिटणीस पदी प्रेरणापुंजचे चांदूर रेल्वे तालुका प्रतिनिधी सुभाष कोटेचा तसेच सचिव पदी मोर्शी तालुक्यातील देशोन्नतीचे दापोरी प्रतिनिधी रुपेश वाळके यांच्यासह १२ जिल्हा सदस्य, तालुका ग्रामीण व शहर असे एकूण ३१ अध्यक्ष, ग्रामीण जिल्हा महिला अध्यक्ष तसेच संघटनेच्या वाढीच्या दृष्टीकोणातून प्रसार माध्यमात काम करणाऱ्या पदाधिकारी व सदस्यांची संघटनेचे संस्थापक सदस्य संदीप बाजड यांच्या सूचनेवरून द पॉवर ऑफ मिडियाचे संस्थापक अध्यक्ष किशोर आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली खालील मान्यवरांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

अमरावती शासकीय विश्राम भवन सभागृहात झालेल्या या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानी द पॉवर ऑफ मिडियाचे संस्थापक अध्यक्ष किशोर आबिटकर होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दर्यापूरचे जेष्ठ पत्रकार गजानन देशमुख, कोल्हापूरच्या जेष्ठ समाजसेविका सौ.रेखाताई आबिटकर, संघटनेचे संस्थापक सदस्य संदीप बाजड, विदर्भ कोर कमेटीचे सदस्य ऋषिकेश वाघमारे, अमरावती विभाग अध्यक्ष प्रा.अजय देशपांडे, आजतक बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी जका खान, अदैत कन्सल्टिंगचे अदैत चव्हाण, व्हीसिएन वूत्तवाहिनीचे संपादक अमोल नानोटकर, उमेश जयस्वाल, आशुतोष जिचकार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अजय देशपांडे यांनी तर सूत्र संचालन अनिता बाजड (काळे) यांनी केले.

आज घोषित करण्यात आलेली जिल्हा कार्यकारणी पुढीलप्रमाणे, अमरावती जिल्हा अध्यक्षपदी व्हीसिएन वूत्तवाहिनीचे प्रबंध संपादक उमेश लोटे यांची निवड करण्यात आली. अमरावतीचे जेष्ठ पत्रकार लोकशाही वार्ताचे विशेष प्रतिनिधी देविदास सूर्यवंशी (मामा) यांची उपाध्यक्षपदी तर सरचिटणीस पदी प्रेरणापुंजचे चांदूर रेल्वे तालुका प्रतिनिधी सुभाष कोटेचा तसेच सचिव पदी मोर्शी तालुक्यातील देशोन्नतीचे दापोरी प्रतिनिधी रुपेश वाळके, जिल्हा संपर्क प्रमुख पदी साहित्यिक मंगेश मोरे, तथा जिल्हा सदस्य पदी देशोन्नतीचे दर्यापूर तालुका प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार गजानन देशमुख, लोकशाही वार्ताचे अचलपूर/परतवाडा प्रतिनिधी आशिष गवई, सकाळचे प्रतिनिधी प्रकाश गुळसुंदरे, मातुभूमीचे वरुड तालुका प्रतिनिधी चंद्रकांत भड, देशोन्नतीचे वितरण व्यवस्थापक मंगेश वानखडे, पुण्यनगरी अमरावती प्रतिनिधी संदीप शेंडे, वृत्तकेसरीचे अमरावती प्रतिनिधी सुरेंद्र बिसने, दिव्यमराठीचे तिवसा प्रतिनिधी स्वप्नील उमप, दिव्यमराठीचे चांदूरबाजार प्रतिनिधी बादल डकरे यांची तर जिल्हा मुख्य सल्लागार सदस्यपदी नवप्रहारचे संपादक संजय पांडे, तर कृषिप्रधान वाहिनीचे संपादक धीरज मानमोडे, सुदर्शन वूत्तवाहिनीच्या जिल्हा प्रतिनिधी पुष्पा जैन व वाशिम जिल्हा सदस्यपदी राहुल भुतेकर, महादेव हरणे, दिव्यमराठी रिसोडचे प्रतिनिधी संदीप पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

त्याचबरोबर अमरावती महिला जिल्हा अध्यक्षपदी अहिल्या किरणच्या प्रतिनिधी व साहित्यिक संगिताताई भेंडे (ढोके), महिला शहराध्यक्ष पदी हिंदुस्थानच्या प्रतिनिधी कु. दिपा पाल तर अमरावती शहराध्यक्ष पदी जनमाध्यमचे विशेष प्रतिनिधी स्वप्नील सावळे, व बडनेरा शहर अध्यक्षपदी जीवन राऊत यांची तर भातकुली तालुका अध्यक्षपदी देशोन्नतीचे संतोष शिंदे तर शहर अध्यक्षपदी लोकमतचे किशोर लेंडे, दर्यापूर तालुका अध्यक्षपदी विदर्भ मिडियाचे अमोल कंठाळे व शहर अध्यक्षपदी लोकमतचे किरण होले, अंजनगाव (सुर्जी.) तालुका अध्यक्षपदी लोकमतचे मनोहर मुरकुटे, शहर अध्यक्षपदी पुण्यनगरीचे प्रवीण बोके, अचलपूर – परतवाडा तालुका अध्यक्षपदी भास्करचे पंकज साबू व अचलपूर शहर अध्यक्षपदी अमरावती मंडळचे फिरोज खान, चांदूरबाजार तालुका अध्यक्षपदी देशोन्नतीचे अनिल उर्फ शशिकांत नीचत तर शहर अध्यक्षपदी सकाळचे वैभव उमक, चिखलदरा तालुका अध्यक्षपदी देशोन्नतीचे विनायक येवले तर शहर अध्यक्षपदी सकाळचे नारायण येवले, त्याचबरोबर धारणी तालुका अध्यक्षपदी पुण्यनगरीचे पंकज लायदे व शहर अध्यक्षपदी सकाळचे प्रतिक मालवीय तसेच मोर्शी तालुका अध्यक्षपदी अजय पाटील व शहर अध्यक्षपदी तरुणभारतचे संजय घारपवार, वरुड तालुका अध्यक्षपदी प्रतिदिन अखबारचे दीपक खंडेलवाल तथा शहर अध्यक्षपदी तरुणभारतचे विलास पाटील, तिवसा तालुका अध्यक्षपदी सकाळचे कृष्णा उमप व शहर अध्यक्षपदी देशोन्नतीचे संदेश मेश्राम, चांदूररेल्वे तालुका अध्यक्षपदी सिसिएन वृत्तवाहिनीचे संपादक अमोल गवळी तर शहर अध्यक्षपदी राजेश सराफी, धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्षपदी विदर्भ २४ तास वृत्तवाहिनीचे छगन जाधव व शहर अध्यक्षपदी जिएम न्यूज वृत्तवाहिनीचे वैभव बावनकुळे, नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्षपदी लोकमतचे अमोल धवसे तर शहर अध्यक्षपदी लोकमतचे विनेश बेलसरे व अमरावती शहर सदस्यपदी आशिष इंगळे, पदमाकर मांडवधरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.