अंबाजोगाई दर्शन आयोजीत राज्य स्थरीय ‘ भजन व समुह नृत्य स्पर्धाचे शनिवारी उदघाटन.

0
1108

बीड: नितीन ढाकणे,दिपक गित्ते
अंबाजोगाईत एक व दोन सप्टेंबर राज्यस्तरीय सांप्रादायीक समूह भजन व समूह नृत्य स्पर्धाचे आद्य कवी मुकुंदराज सांस्कृतीक सभागृहात शनिवारी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता होणार असल्याची माहीती अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलचे संपादक श्री .सतिश मोरे व सहसंपादक श्री . नागेश औताडे यानी दिली आहे .
या राज्यस्तरीय स्पर्धासाठी उदघाटन समारंभास आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्वाजवादक श्री . उध्दव बापू आपेगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून क्रार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री . नंदकीशोर मुंदडा तर उदघाटक म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी बीड जिल्हा अध्यक्ष श्री .बजरंग बप्पा सोनवणे , माजी आमदार पृथ्वीराज साठे , बीड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर पापा मोदी, बीड जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती श्री . राजेसाहेब देशमूख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून तसेच दिनांक दोन सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता समूहनृत्य स्पर्धा उदघाटन कार्यक्रम अध्यक्ष अंबाजोगाई सहकारी साखर कारखानाचे चेयरमन श्री . रमेशराव आडसकर तर उदघाटक म्हणून केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौं . संगिताताई ठोंबरे या राहणार असून प्रमूख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकत्या सौ . अंजली ताई घाडगे , मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री . दत्ता आबा पाटील , शिवसेना परळी विधानसभा संपर्क प्रमुख श्री . प्रकाश तेलगोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तर बक्षीस वितरण समारोप कार्यक्रमास अध्यक्षस्थानी नगरअध्यक्षा सौ . रचना मोदी प्रमुख अतिथी म्हणून सौ . नमिता अक्षय मुंदडा , अंबाजोगाई पंचायत समितीच्या सभापती सौ .मीनाताई भताने , शिवसंग्राम युवा तालुका अध्यक्ष इंजि. ऋषिकेश लोमटे , इंजिनीयरींग कॉलेज प्राचार्य बी .वाय. खडकभावी , टी .बी. गिरवलकर पॉलीटेक्निक कॉलेजचे प्राचार्य एम .बी. शेट्टी , स्वा रा. रुग्णालय व वैद्यकीय महाविदयालयाचे अधिष्ठता डॉ . सुधीर देशमुख , मराठी पत्रकार संघ बीड जिल्हा कार्याध्यक्ष श्री . दत्तात्रय अंबेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या राज्यस्तरीय स्पर्धा पाह०यासाठी अंबाजोगाई पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलच्या वतीने करण्यात आले आहे .