स्नेह का धागा – रक्षा का वादा ; निराधार विधवा महिलेचे आकोट पोलिस बनले भाऊ

0
1045

अकोट(संतोष विणके) -शहरातील निराधार विधवा महिला उज्वला अस्वार या महीलेला आकोट शहर पोलिसांनी जगण्याच बळ मिळावं म्हणुन शिलाई मशीनची भेट दिली.नुकताच रक्षाबंधन हा सण साजरा झाला अश्यातच निराधार विधवा महीलेच्या या मदतीसाठी धावुन आलेले पोलीस भाऊ हे आकोटात कौतुकाचा विषय ठरले आहेत.

शहरातील बळीराम चौक येथील गोविंद मानिराम अस्वार हे गरीब पण कष्टाळू इसम दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत होते,शेतात विषारी औषध फवारत असतांना त्यांना विषबाधा झाल्याने अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यु झाला, त्यांचे मृत्यू नंतर त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले, पत्नी उज्वलाअस्वार ह्यांचे पुढे कुटुंब चालविण्याची जबाबदारी येऊन पडली, दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून ती कसे तरी आपली जबाबदारी पार पडण्याचा प्रयत्न करीत होती परंतु बऱ्याच वेळेस मजुरी न मिळाल्यास त्यांचे कुटुंबावर उपासमारीची पाळी येत होती. सदर माहिती अकोट शहरातील सामाजिक कार्यकर्ते व प्रहार चे शहर प्रमुख सागर उकंडे ह्यांनी शहर पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांना सांगितले , ठाणेदारा शेळके यांनी खातरजमा करुन या गरीब निराधार विधवा महीलेची मदत करायचे ठरवले अन निराधार बहीणी मागे भाऊ म्हणुनठाणेदार गजानन शेळेके उभे राहले.

अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर ह्यांचे संकल्पनेतून अकोट शहरा मध्ये जननी2 अंतर्गत विविध उपक्रम पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी राबविले होते, त्या वेळी त्यांनी जननी उपक्रम काही दिवसापूरता नसून आवश्यकते प्रमाणे वर्षभर राबविण्याचा मानस व्यक्त केला होता, त्या अंतर्गत समाजातील अबला महिलांना सबला करण्या साठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले होते, त्याचाच एक भाग म्हणून अकोट शहरातील एक गरजू व निराधार विधवा स्त्री ला तिच्या कुटुंबाचे पालन पोषण करण्या साठी तिच्या इच्छा प्रमाणे शिलाई मशीन देऊन खऱ्या अर्थाने जननी मोहीम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला। , शहर पोलिस्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांनी सदर स्त्री ला मदत करण्याचे ठरवून साहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी दिवेकर, ज्ञानोबा फड, पोलिस उपनिरीक्षक आशिष शिंदे, महेंद्र गवई, सोळंके, ह्यांनी वर्गणी गोळा करून व पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी त्या मध्ये आपला मदतीचा मोठा वाटा टाकून सदर महिलेला तिच्या गरजे प्रमाणे शिवण कला येत असल्याने शिलाई मशीन घेऊन दिली व आज दिनांक 31।8।18 रोजी सन्मान पूर्वक सदर महिलेच्या निवासस्थानी नेऊन दिली, ह्या प्रसंगी पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितले की जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल सोनवणे ह्यांचे मार्गदर्शनाखाली जननी2 अंतर्गत अश्या गरजू, निराधार महिलांना सबल बनविण्या साठी अकोट शहर पोलिस नेहमी तत्पर असतील त्याच प्रमाणे ,मुली व महिलांनी न घाबरता पुढे महीलांच्या हक्क तथा अधिकारांसंबधी आपल्या तक्रारी पोलिसांना सांगाव्या , सत्यता पडताळून निश्चित पणे कार्यवाही करण्यात येईल.असे सांगीतले,