अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष नियुक्त म्हणजे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्ग.चे यश

0
929

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष तथा उपाध्यक्ष यांची नियुक्त करण्यात आली हे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्ग.चे यश असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दरम्यान ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्ग.चे अध्यक्ष लवकरात लवकर नियुक्त करावे म्हणून संघटनेचे राज्य सचिव शाहरुख मुलाणी यांनी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना लेखी निवेदन दिले होते. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, ओबीसी मंत्री प्रा. राम शिंदे आदींना लेखी पत्र देत त्यासंदर्भात सतत पाठपुरावा करत होते, शेवटी राज्य सरकारने निवडणुका लक्षात घेता महामंडळे व मंडळे निवडल्याचे मुलाणी यांनी सांगितले.