विदर्भातील जलरत्नांनी केली वॉटर कप स्पर्धेमध्ये झालेल्या श्रमदानाच्या कामाची पाहणी-दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यामध्ये विदर्भातील शेकडो युवक सहभागी

0
967
Google search engine
Google search engine

दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यामध्ये श्रमदान करून घेतले पानलोटांच्या उपचाराचे ज्ञान

गव्हानकुंड येथील ट्रेनिंग सेंटरला भेट देऊन जाणून घेतल्या उपाय योजना

रुपेश वाळके / विशेष प्रतिनिधी –

काही वर्षांपासून महाराष्ट्रात दुष्काळाने ठाण मांडले आहे. पाण्यावाचून दाही दिशा अशी सर्वत्र परिस्थिती आहे. माणसाच्या दैनंदिन आवश्यक गरजा पूर्ण करण्याइतका जलसाठाही आज राज्यात नाही. केवळ शेतीसाठी वा पिण्यासाठी पाणी नाही एवढेच हे संकट सीमित नाही, तर पावसाच्या कमतरतेमुळे आणि वाढत्या उष्म्यामुळे भूजलस्तर दिवसेंदिवस खालावत चालला आहे. या सगळयाचा परिणाम माणसाच्या जीवनमानावर झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आज दुष्काळाच्या परिस्थितीशी लढा देण्यासाठी अनेक व्यक्तींनी, युवती , युवकांनी कंबर कसली असल्याचे चित्र गव्हाणकुंड येथील दोन दिवसीय अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने विदर्भातील शेकडो जलरत्नांनी श्रामदानाच्या माध्यमातून पानलोटाचे माथा ते पायथा उपचार समजावून घेऊन आपले गाव दुष्काळमुक्त पाणीदार करण्यासाठी शेकडो हात धडपळ करतांना दिसत होते

सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून वरुड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली वरुड तालुक्यातील नागरिकांनी श्रमदानाच्या माध्यमातून पूर्ण केली आणि वरुड तालुक्यातील काही गावे आदर्श ठरली त्या आदर्श गावातील अनेक सामाजिक समस्यांचा आणि गावकऱ्यांनी केलेल्या कामाचा आढावा दोन दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करून विदर्भातील विविध भागातील जलरत्नांनी , युवती , युवकांनी वरुड तालुक्यातील गव्हाणकुंड येथील २०१६ , २०१७ , २०१८ , मध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या जलसंधारणाच्या कामाचा वॉटर कप स्पर्धेमध्ये झालेल्या कामाचा आढावा जाणून घेण्याचा प्रयत्न केला . देशातूनच नाही तर जगभरातून असंख्य लोक टीव्ही आणि इंटरनेटच्या माध्यमांतून पाणी फाउंडेशन सोबत जोडले गेले. त्यानुसार अनेकांनी कामेही सुरू केली होती. अनेक स्तरांवर लोकांनी सक्रिय सहभाग घेतल्यामुळे बदल सुरू झाला, गोष्टी बदलू लागल्या. वरुड तालुक्यातील गव्हांनकुंड येथील झालेल्या कामांमुळे कळत आहे की लोकांना परिवर्तन हवे आहे आणि त्यासाठी त्यांची काम करण्याची देखील इच्छा आहे हे वरुड तालुक्यातील नागरिकांनी दाखवून दिले आहे

पाणी ही एक अशी समस्या आहे जी सगळीकडे दिसून येते. गाव असो की शहर, पाण्याची समस्या सर्वत्र सारखीच आहे. येणाऱ्या काही दिवसात काय परिस्थिती असेल याचा विचार देखील करवत नाही. खासकरून गावात, कारण जिथे पाणी नाही तिथे शेती नाही. पाण्या अभावी शेतीतील उत्पन्नात मोठ्या प्रमाणात तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो , पाणी टंचाईच्या या जीवघेण्या परिस्थितीला कंटाळून अनेकजण गाव सोडून शहराकडे जात असल्याचे पाहायला मिळत आहे .

त्यासाठी या सगळ्या गावांनी एकत्र येऊन आपल्या गावांमध्ये अत्यंत कमी खर्चात होणारे जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्राचे काम केले आहे . या कामाचा परिणाम म्हणजे त्यांच्या भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे . या गावांवर पडलेल्या पावसाचा एकही थेंब वाहून जात नाही . पावसाच्या पाण्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने साठवून अडवून ठेवले गेले आहे . हे काम प्रत्येक गाव, प्रत्येक शहरात करता येण्यासारखे आहे. प्रत्येक गाव हिरवेगार व समृद्ध होऊ शकते कारण हे काम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सोपे, शक्य आणि कमी खर्चात होणारे आहे .

पानी फाउंडेशनच्या माध्यमातून केवळ पाण्याच्या संकटाबाबत जनजागृतीच करत नाही तर ट्रेनिंगद्वारे तांत्रिक माहिती देऊन शेतकऱ्यांना सक्षम केले जात आहे . पाणी फाउंडेशन ला हा विश्वास आहे की पाण्याच्या या संकटावर मात करण्यासाठी लागणारी सगळ्यात मोठी ताकद लोकांच्याच हातात आहे. कारण जिथे जिथे ही समस्या सोडवली गेली तिथे तिथे लोकांच्या मेहनतीमुळे आणि प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले असल्याचे जिवंत उदाहरण वरुड तालुक्यामधील गव्हाणकुंड येथे पाहायला मिळत आहे त्याचाच आढावा घेऊन मथा ते पायथा पानलोटाचे उपचार करून असा प्रयोग विदर्भातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये करून आपला तालुका आपले गाव ड्राय झोन मुक्त करून गाव पाणीदार करण्यासाठी पाणी फाउंडेशन मार्फत श्रमदानाच्या माध्यमातून झालेल्या कामाची पाहणी करून स्वतः श्रमदान करून पाणलोटाचे उपचार समजून घेण्यासाठी आलेल्या युवकांना भेट देण्यासाठी वरूडचे तहसीलदार आशिष बीजवल , गट विकास अधिकारी सुभाष बोपटे यांनी भेट देऊन युवकांना मार्गदर्शन केले तसेच विविध पानलोटाचे उपचार समजावून देण्यासाठी पाणी फाउंडेशन चे विदर्भ माष्टर ट्रेनर सुमित गोरले , प्रवीण बागडे , जिल्हा समन्वयक अतुल काळे , तालुका समन्वयक रुपेश वाळके , आंबदास खडसान , हरीश खासबागे , अतुल तायडे , यांच्यासह टेक्निकल ट्रेनर , सोशल ट्रेनर , यांनी शेकडो जलरत्नांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना पाणलोट उपचाराचे शास्त्र शुद्ध पद्धतीने समजावून सांगितले त्यावेळी आपले गाव दुष्काळमुक्त करून पाणीदार बनविण्यासाठी विदर्भातून विविध जिल्ह्यांमधून आलेले शेकडो जलरत्न युवक युवती दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते .