चांदुर बाजार येथील महावितरण कार्यलाय मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार ,

0
1132
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार येथील महावितरण कार्यलाय मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार
अभियंता कडून केली जाते वरिष्ठ अधिकारी यांचे नाव सांगून पैशाची मागणी

चांदुर बाजार:-बादल डकरे

एकीकडे महावितरण कार्यलाय ऑनलाईन होते आहे तर दुसरी कडे वेतन असून देखील कनिष्ठ अभियंता हे वरिष्ठ अधिकरी याचे नाव सांगून महावितरण च्या ग्राहकाकडून पैसा ची मागणी करत असल्याचे चांदुर बाजार उपविभागीय कार्यलाय अंतर्गत होते आहे.या संबंधी वरिष्ठ अधिकारी यांना याची माहिती आहे.पण आपले नाव असल्याने त्याची कनिष्ठ अभियंता यांच्या कार्यवाही करण्याचे ऐवजी फक्त तोंडी समज दिले असल्याचे समजते.मात्र या कनिष्ठ अभियंता यांच्या पैशाच्या मागणी आता अधिक वाढली आहे.

हा कनिष्ठ अभियंता आता ग्राहकांना मीटर वितरक करतांना तसेच आपल्या कार्यलाय मधील कर्मचारी याना सुद्धा मानसीक आणि आर्थिक त्रास देत असल्याचे दिसत आहे. तर आपले वरिष्ठ अधिकारी असल्याचे कार्यलयात काम करणारे कर्मचारी हे त्या अधिकारी याचे कुठल्याही प्रकारची तक्रार करीत नाही आहे.तर तिकडे ग्राहक या भीतीने समोर येत नाही की आपल्याला बिल जास्त देण्यात येतील. मात्र या अभियंता या सर्व गोष्टी चा फायदा घेत आपला मनमानी पणा करीत आहे.

चांदुर बाजार उपविभागीय कार्यलाय अंतर्गत काम करत असलेल्या या अभियंता ला कोणाचीच भीत नसल्याचे दिसून येते आहे तर वरिष्ठ अभियंता सुद्धा त्या कनिष्ठ अभियंता ला मुके पाठबळ देत आहे.त्यामुळे हा अभियंता कोणत्याही कामात आपला हिस्सा पाहत असतो.तसेच झालेल्या आर्थिक व्यवहार चा काही हिस्सा वरिष्ठ ला मिळत असल्याने त्या अधिकारी वर कार्यवाही करण्यात येत तर नाही? याची चर्चा सुरू आहे. तर या अभियंता च्या या मनमानी पणा मुळे होणाऱ्या अनेक त्रासाला चांदुर बाजार येथील महावितरण चे ग्राहक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहे.त्यामुळे अश्या बेजबाबदार कनिष्ठ अभियंता वर उपकार्यकरी अभियंता कार्यवाही करणार का?आपल्या नाव असल्यामुळे कार्यवाही टाळतील हे पाहावे लागेल.

नेहमी भ्रष्टाचार मध्ये पोलीस विभाग आणि महसूल विभाग चर्चेत असतात मात्र चांदुर बाजार तालुक्यामध्ये महावितरण कार्यलाय हे या बाबतीत अव्वल असल्याचे दिसत आहे. याला वेळेतच अंकुश लावला पाहिजे अशी चर्चा चांदुर बाजार तालुक्यत सुरू आहे.