या आठवड्यातील बीड ए.सी.बी ची तिसरी यशस्वी कारवाई

0
1366
Google search engine
Google search engine

वैद्यनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकिशोर पापालाल मोदी ए.सी.बी च्या जाळ्यात.

परळीतील आदर्श शिक्षण संस्थेला काळिमा.

प्रतिनिधी :- दिपक गित्ते/ नितीन ढाकणे

दिनांक २८/०८/२०१८ रोजी दिलेल्या तक्रारीवरून स संस्थेच्या माध्यमातून सन २०१२ मध्ये संस्थेने ४ शिक्षक व एक लिपिक यांची नेमणूक नियमबाह्य असल्याच्या कारणाने त्यांना सेवेरून कार्यमुक्त केले होते.  परळी वै  येथील वैद्यनाथ विद्यालयाचे  मुख्याध्यापक मोदी यांनी कनिष्ठ लिपिक यांना बोलावून सांगितले की सेवा समाप्त कर्मचार्यांपैकी दोन कर्मचाऱ्यांनी शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांच्याकडे तक्रार केली असून सदर चौकशी शिक्षणाधिकारी बीड (मा) यांच्याकडे चालू आहे . तुला चौकशी मध्ये मुख्याध्यापक मोदी यांनी लिपिक या पदाविषयी बाजू मांडण्यासाठी २,००,००० रुपयांची मागणी केली.
सदर लिपिकाने त्यांना पैसे दिले नाहीत तर त्यांची सेवा समाप्त करून त्यांच्या ऐवजी रोहित काळे यास सेवेत परत रुजू करण्यात येईल असे सांगून परत लाचेची मागणी केली.
या विषयीच्या तक्रारिवरून आज दिनांक ३१/०८/२०१८ रोजी परळी वै. येथे बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी मुख्याध्यापक नंदकिशोर पापालाल मोदी यांना १,५०,००० रुपये घेताना सापळा रचून रंगेहात पकडले.
सदरची कारवाई मा. श्रीकांत परोपकारी ( पोलीस अधीक्षक) , एस. एस. जिरगे ( अप्पर पोलीस अधीक्षक औरंगाबाद) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील , पोलीस निरीक्षक गजानन वाघ, व कल्याण राठोड, मनोज गदळे, सखाराम घोलप, भरत गारदे, अशोक ठोकळ, दादासाहेब केदार, विकास मुंडे, अमोल बागलाने यांनी केली.