सातपुड्याच्या पायथ्याशी ईलु ईलु करणाऱ्यां ११ अल्पवयीन युवक-युवतींना अकोट पोलिसांचा दणका

0
1337
Google search engine
Google search engine

अकोट :- संतोष विणके – मनभावन श्रावण बहरलेला असतांना….बेधुंद करणाऱ्या हीरवळीच्या आसऱ्याने पोपटखेड परीसरात गेल्या काही दिवसांपासुन अल्पवयीन प्रेमीजनांनी प्रेमाच्या चाळ्याचा बाजार मांडला होता.मात्र निर्जन स्थळी ईलु ईलु करणाऱ्या या अल्पवयीन प्रेमी जनांनवर कारवाई करुन आकोट ग्रामीण पोलीसांनी चांगलाच दणका दिलाय.दरम्यान या कारवाईने पालकांना चाट मारुन भटकणाऱ्यां लव्ह बर्डसना धक्काच बसला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार अकोटातील शाळा, महाविद्यालय, शिकवणी च्या नावाने घरातून बाहेर पडणाऱ्या काही विद्यार्थी पालकांची तसेच शिक्षकाची दिशाभूल करीत पोपटखेड परिसतील विशिष्ठ भागात युवक-युवती नेहमीच दिसून येतात.या प्रकाराची अनेक दिवसांपासून ओरड सुरू होती. या प्रकाराकडे पोलीसांनी गांभीर्याने लक्ष वेधून ११ अल्पवयीन जणांना पकडले.
अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोपटखेड व परिसरातील काही भागात आंबट शौकीन जात असल्याची खात्रीलायक माहिती ठाणेदार मिलिंदकुमार बहाकर यांना मिळाली.दरम्यान ठाणेदार मिलींदकुमार बहाकर,पीएसआय अनुराधा पाटेखेडे व सहकार्यानी शनिवारी या परिसरात साध्या कपड्यात दुचाकीवरून या भागात गस्त सुरू केली. यावेळी त्यांना ५ अल्पवयीन मुली व ६ अल्पवयीन मुले दिसून आली.त्यांना विचारणा केली मात्र समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने सर्वाना पोलीस स्टेशनला आणले.पोलिसांनी सर्वांच्या पालकांना बोलावून त्याच्या ताब्यात दिले.पालक पोलीस ठाण्यात आल्यानंतर अनेकांचे पितळ उघडे पडले, कारण काहींनी शिकवणी तर अनेकांनी विविध कारणे सांगून घराबाहेर प्रवेश केला होता.या पूर्वी पोपटखेड परिसतील निर्जन ठिकाणावर बलात्कार, खून असे गंभीर प्रकार घडले आहेत. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीचे सर्वत्र कौतूक होत आहे.ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे, ठाणेदार मिलींदकुमार बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पीएसआय अनुराधा पाटेखेडे,हशमत पठाण,श्री कृष्ण गावंडे, सुनील फोकमारे,स्वप्नील सरोदे,राजू जोंधारकर,मोतीराम गोडचोवर, केशव मोंढे, पंजाबराव कराळे,महेश श्रीवास व महिला कर्मचारी यांनी केली

ठाणेदार बहाकर यांचे नागरीकांना आवाहन

कोणतीही घटना घडण्याअगोदर आधीच खबरदारी घेतली तर अनेक गंभीर प्रकाराला आळा बसू शकतो, कोणालाही काही अनुचित प्रकार दिसून आला तर सजग नागरिक म्हणून पोलिसांना माहिती द्यावी आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल
मिलिंदकुमार बहाकर,
ठाणेदार अकोट ग्रामीण